नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी अनेक विकास कामांची उद्घाटनं केलीत. त्यातील महत्वाचे म्हणजे मुंबई मेट्रोचे उद्घाटन. परंतु विरोधी पक्षाने या दौऱ्यावर निशाणा साधत जोरदार टीका करायला सुरवात केली आहे.
या दौऱ्याला ज्या विकास कामांची उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली ती कामे ठाकरे सरकारने केलेले आहेत असा विरोधी पक्ष दावा करत आहे. परंतु या कामांचे श्रेय मात्र शिंदे सरकार घेत आहे असेही म्हटले आहे. भाजप या सगळ्यांची श्रेय घेत आहे असे ठाकरे गटाकडून बोलले जात आहे.
अशातच सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत सरकारवर टीका केली आहे. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोत एका बाजूला नरेंद्र मोदी आणि बाळासाहेब ठाकरे आहेत तर दुसऱ्या बाजूला नरेंद मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. या फोटोवरून सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बोचरी टीका केली आहे.
जेव्हापासून सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे तेंव्हापासून त्यांचे टीका करण्याचे सत्र सुरूच आहे. महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने त्यांचे दौरे सुरू आहेत. भाजप आणि शिंदे गटावर त्या सातत्याने टीका करत असतातच. यातच आता त्यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
हा फोटो जुना असून यात जेव्हा नरेंद मोदी मुंबई दौऱ्यावर आले होते तेव्हा बाळासाहेब ठाकरेंना नमस्कार करतांना दिसत आहेत. पंतप्रधानांचा यावेळेसच्या मुंबई दौऱ्याला उद्देशून हा फोटो शेअर करण्यात आला आहे. तसेच या फोटोवरून शिंदेवर निशाणा साधण्यात आला आहे.
हा फोटो ट्विटरवर शेअर करत तसुषमा अंधारे यांनी लिहिले आहे की,’हाच तो फरक’, बाळासाहेब ठाकरेंच्या वेळीस त्यांचे राजकीय स्थान काय होते आणि आता एकनाथ शिंदे यांचे राजकीय स्थान काय आहे, अशी या फोटोमधून बोचरी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.
महत्वाच्या बातम्या
निवडणूक आयोगाने काय त्यांच्या कानात…; सुषमा अंधारेंनी शिंदे गटाच्या आमदारांना झाप झाप झापले
पक्षप्रमुखपद वाचवण्यासाठी ठाकरेंची मोठी खेळी, आयोगाकडे ‘या’ दोन मागण्या करत वाढवलं शिंदेंचं टेंशन
एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्रिपद जाणार, भाजप-शिंदे सरकार कोसळणार; समोर आली मोठी माहिती