भाजप आमदाराने केले महिलेचे लैंगिक शोषण, दिली जीवे मारण्याची धमकी, गंभीर आरोपांनंतर गुन्हा दाखल

भाजपच्या गोटात खळबळ उडवणारी बातमी आता समोर येत आहे. जिवे मारण्याची धमकी दिल्याची पीडित महिलेने भाजपचे (BJP) आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्याविरोधात तक्रार दिली होती. अखेर आता या प्रकरणी नाईक यांच्या अडचणींमद्धे वाढ झालेली पाहायला मिळत आहे.

या प्रकरणी भाजपचे आमदार गणेश नाईक यांच्यावर सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतल्यानंतर महिलेच्या तक्रारीवरून नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाचा नेमकं प्रकरण काय..?

काही दिवसांपूर्वी भाजप आमदार गणेश नाईक यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले होते. गणेश नाईक आणि मी लिव्ह इनमध्ये राहत होतो, त्यांच्याकडून मला एक मुलगाही झाला आहे. आता ते मला आणि माझ्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देत आहे, अशी तक्रार एका महिलेने महिला आयोगाकडे केली होती.

१९९३ पासून गणेश नाईकांचे माझेसोबत संबंध असल्याचे त्या महिलेने म्हटले होते. तसेच लग्नाचे आमिष दाखवून आणि जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांनी लैंगिक शोषण केल्याचा आरोपही त्या महिलेने केला. मुलाला त्यांचं नाव दिलं जावं अशी मागणी केल्यानंतर त्यांनी आपल्याला बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोपही महिलेनं केला.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पीडित महिलेने महिला आयोगाकडे याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, गणेश नाईक माझ्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. त्यांच्यापासून मला एक मुलगा झाला आहे. आता गणेश नाईक मला मारुन टाकण्याची धमकी देत आहे, असे महिलेने तक्रारीत म्हटले होते.

गणेश नाईक आठवड्यातून दोन-तीन दिवस माझ्यासोबत राहायचे. त्यांचे माझ्यासोबत शरीर संबंधही होते. तेव्हा ते महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री होते. आता माझा मुलगा १५ वर्षांचा झाला आहे. त्याच्या शिक्षणाबाबत आणि भविष्याबाबत ठोस उपाययोजना करा, असे मी त्यांना सांगितले तर ते टाळा टाळ करत आहे, असेही संबंधित महिलेने तक्रारीत म्हटले होते.

महत्त्वाच्या बातम्या