Share

…म्हणून राष्ट्रपतिपदाची उमेदवारी नाकारली; शरद पवारांनी केला मोठा खुलासा

राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक येत्या १८ जुलैला होत आहे. काही दिवसांपूर्वीच या निवडणुकीत भाजपने आपल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे. भाजपने द्रौपदी मुर्मू यांना उमेदवार म्हणून घोषित केले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी याबाबत घोषणा केली आहे.

२१ जुलैला देशाला नवीन राष्ट्रपती मिळतील. भाजपकडून द्रौपदी मुर्मू यांचं नाव घोषित करण्यात आलं तर दुसरीकडे विरोधकांकडून यशवंत सिन्हा यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनवले आहे. भाजप वगळता देशातील राजकीय पक्षांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रपतिपदासाठी निवडणूक लढवावी, असा आग्रह केला होता.

मात्र पवारांनी या निवडणुकीत उतरण्यास स्पष्ट नकार दिला. निवडणुकीत सहभागी न होण्यामागच तस कारण देखील शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे. रविवारी औरंगाबाद मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना पवारांनी पुन्हा एकदा यावर भाष्य केलं आहे.

याबाबत बोलताना पवार म्हणाले, “मला भाजपा वगळता इतर सर्व राष्ट्रीय पक्षांनी मला राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्यासाठी आग्रह केला होता. पण माझं वैयक्तिक मत असं आहे की हे ज्या पद्धतीचे पद आहे त्यासाठी उमेदवारीचा प्रस्ताव आपण स्वीकारू नये.’

पुढे बोलताना पवारांनी म्हंटलं आहे की, ‘हा प्रस्ताव मी स्वीकारला नाही, कारण मी जर राष्ट्रपती झालो असतो तर माझ्यासारख्या माणसांमध्ये रमणाऱ्याला एका ठिकाणी जाणं आणि तिथंच जाऊन बसणं हे शक्य झालं नसतं”, अशी भूमिका शरद पवारांनी यावेळी बोलताना स्पष्ट केली.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे.विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे आता राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची अधिसूचना जाहीर केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या
रामचरणच्या पत्नीने आई न होण्याचा निर्णय घेतल्यानंतर अध्यात्मिक गुरू म्हणाले, मानव ही लुप्त होणारी किंवा..
एकनाथ शिंदेंची गोची! ‘हा’ आमदार भ्रष्टाचारी; मंत्रीपद देऊ नका; थेट अमित शहा यांना लिहिणार पत्र
मानलं गड्या! ९ कोटींची नोकरी सोडून ‘या’ पोरीने घेतला संन्यास, कारण वाचून कौतुक कराल
काय चाललंय काय? राष्ट्रपती भवनाच्या स्विमिंग पुलमध्ये आंदोलकांची मस्ती, भवनाच्या बेडरूममध्ये..

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now