चीन आणि युरोपीय देशांमध्ये कोरोनाच्या झपाट्याने वाढणाऱ्या रुग्णानंतर आता चौथ्या लाटेची भीती आणखी वाढली आहे. कोरोनाच्या झपाट्याने वाढणाऱ्या केसेसमागे ओमिक्रॉनचे सबव्हेरियंट कारणीभूत असल्याचे मानले जाते. संभाव्य धोका लक्षात घेता, तज्ज्ञांनी काही माहिती दिली आहे.
दक्षिण कोरियामध्ये Omicron चे BA2 कोरोना प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दक्षिण कोरियाबरोबर ब्रिटन आणि इतर अनेक युरोपीय देशांमध्ये एकाच दिवसात 6 लाखांहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. मात्र, भारतात लगेचच नवीन लाट येण्याची चिंता भारतीय तज्ज्ञांना वाटत नाही.
तज्ञांचे म्हणणे आहे की, डिसेंबर 2021 ते फेब्रुवारी दरम्यान आलेल्या तिसऱ्या लाटेमुळे लोकांची प्रतिकारशक्ती वाढली आहे. तसेच, देशातील अनेक राज्यांमध्ये लसीकरणाचे प्रमाण खूप जास्त आहे. त्यामुळे, भविष्यात येणाऱ्या चौथ्या लाटेचा तितकासा परिणाम होणार नाही.
तथापि, राज्याचे माजी आरोग्य सेवा महासंचालक आणि राज्य सरकारचे तांत्रिक सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे म्हणाले की, चौथी लाट जगाच्या इतर भागांप्रमाणे भारतावरही येऊ शकते म्हणून आम्ही आमची तयारी कमी करू शकत नाही. डॉ. साळुंखे म्हणाले की, चौथी लाट नेमकी केव्हा येईल आणि ती किती तीव्र असेल हे माहीती नाही.
कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉनच्या प्रकारात 50 हून अधिक व्हेरियंट झाले आहेत. नोव्हेंबर 2021 मध्ये दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा आढळून आल्यावर यामुळे जगभरात दहशत निर्माण झाली. हा प्रकार अत्यंत संसर्गजन्य होता. त्यामुळे रूग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण वाढल्याने मोठ्या प्रमाणात लोकांना जीव गमवावा लागला. लसीकरणामुळे या प्रकारामुळे परिस्थितीत बरीच सुधारणा झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
महाराष्ट्र सरकारच्या कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी म्हणतात की, Omicron KBA 1 आणि BA 2 हे दोन्ही प्रकार सुरुवातीला देशात तिसर्या लाटेदरम्यान उघड झाले होते. सध्या भारतात कोविडची नवीन लाट येण्याचा धोका नाही तितकासा नाही.
तसेच, इस्रायलमध्ये सापडलेल्या नवीन प्रकाराबाबत डॉ. जोशी म्हणाले की, हे अद्याप व्हेरिएंट ऑफ कन्सर्न (VoC) म्हणून घोषित केलेले नाही. त्यामुळे जोपर्यंत नवीन VOC येत नाही तोपर्यंत घाबरण्याचे कारण नाही. तथापि, आपण मास्क घालणे थांबवू नये. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की SARSCoV-2 विषाणू एंटीबॉडीज कमी असल्यास लोकांना पुन्हा संक्रमित करू शकतो.