Share

बंडखोर आमदारांच्या मुलांची युवासेनेच्या पदांवरून होणार हकलपट्टी; सेना पदाधिकाऱ्यांचे आदित्य ठाकरेंना निवेदन

aditya thackeray

शिवसेनेविरोधात केलेली बंडखोरी आता आमदारांना आणखीच महागात पडणार असल्याच बोललं जातं आहे. बंडखोर आमदारांच्या मुलांना युवासेनेच्या पदांवरून हटवण्यासाठी शिवसेना पदाधिकारी आता आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. त्यांनी थेट याबद्दल राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना निवेदन दिलं आहे.

ज्या आमदारांनी शिवसेनेशी बंडखोरी केली, त्या आमदारांच्या मुलांना पदावरून हटवण्यात यावे अशी मागणी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली  आहे. त्यासंदर्भातील निवेदन आदित्य ठाकरे यांना देण्यात  आले आहे. याबाबत लवकरच निर्णय घेऊ असे आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे.

यामुळे आता बंडखोरी केलेल्या आमदारांच्या मुलांची देखील पद धोक्यात येणार आहेत. यावर आता आदित्य ठाकरे नेमकी कशी अॅक्शन घेतायेत? हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, आता बंडखोर आमदारांविरोधात शिवसेना नेते चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे.

दरम्यान, शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या आमदारांनी बंड केल्यामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. शिंदेंच्या बंडामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला. सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेचे ४० पेक्षा जास्त आमदार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार धोक्यात आले आहे.

या बंडखोरीनंतर महाराष्ट्रात राजकीय संकट निर्माण झालं आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आमदारांच्या बंडखोरीमुळे शिवसैनिक चांगलेच तापले आहे. शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ राज्यभर आंदोलन करत आहे.

शिवसेनेकडून एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांना चर्चेची दारे खुले ठेवण्यात आली आहे. पण एकनाथ शिंदे शिवसेनेच्या बंडखोर सोबत घेऊन भाजपसोबत सरकार स्थापन करणार असल्याचे सांगितले जात आहे. भाजपने आतापर्यंत या प्रकरणावर थेट भाष्य केलेलं नाही. पण एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीला भाजपचा पाठिंबा आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

महत्त्वाच्या बातम्या
“शिंदेसाहेब तुम्ही निष्ठावान शिवसैनिकासारखे वागला नाहीत, मी तुमच्यासोबत येऊ शकत नाही”
महाराष्ट्रातील सत्तेचा पेच सोडवण्यासाठी आता राज्यपाल मैदानात उतरणार
शिवसेनेसाठी राष्ट्रवादी रणांगणात उतरली; आमदार थांबलेल्या गुवाहाटीतील हाॅटेलबाहेर..
‘या’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने दिला एकनाथ शिंदेंना पाठिंबा; म्हणाले, ते माझ्या सख्ख्या भावासारखे…

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now