ऑस्कर २०२२ दरम्यान शोचा होस्ट ख्रिस रॉकला कानशिलात मारल्यानंतर विल स्मिथ चांगलाच चर्चेत आला होता. लाइव्ह शो दरम्यान त्याने असे कृत्य केले. त्यामुळे काही काळ प्रक्षेपण बंद झाले होते. याच सोहळ्यात त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही मिळाला होता. (will smith addicted to drugs)
विल स्मिथ चर्चेत येण्याची ती काही पहिलीच वेळ नव्हती. याआधीही तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेचा केंद्रबिंदू राहिला आहे. आज आपण त्याच्या आयुष्यासंबंधी काही हैराण करणाऱ्या गोष्टी जाणून घेणार आहोत, ज्या ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल.
स्मिथ आणि त्याची पत्नी जाडा यांनी कधीही त्यांचे अतूट नाते लपवले नाही. इतकंच नाही तर या नात्यातील चढ-उतारांचा या दोघांनीही अनेक प्रसंगी उघडपणे उल्लेख केला. एका मुलाखतीदरम्यान या जोडप्याने ते कधी आणि कसे भेटले हे सांगितले होते. सुरुवातीला त्यांचे नाते कसे होते? हेही सांगितले आहे.
या जोडप्याने सांगितले की जेव्हा ते ९० च्या दशकात भेटले होते. तेव्हा हे नाते प्रेमावर आधारित नव्हते तर लैंगिक होते. विल स्मिथने मुलाखतीत नमूद केले की पहिल्या चार महिन्यांत आम्ही दिवसभर दारू प्यायचो. दिवसातून अनेक वेळा आम्ही सेक्स करायचो.
स्मिथ पुढे म्हणाला होता की, मला वाटायचे की मी या जाडाला तृप्त करेन किंवा मी या प्रयत्नात मरेन. एवढेच नाही तर अनेक महिलांसोबत शारीरिक संबंध असल्याचेही अभिनेत्याने सांगितले होते. विल स्मिथने तो सेक्स ऍडिक्ट असताना मानसिक आजाराशी झुंज देत असल्याचेही सांगितले. तो सेक्स करुन खुप आजारीही पडला होता. पण त्यानंतर तो या सगळ्यातून बाहेर पडला.
जाडाने एकदा विल स्मिथसोबत ब्रेकअप केले होते. ती दुसऱ्या एका व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये आली होती. पण जाडाला वाटले की ती या नात्यात खूश नाही. जेव्हा ती तिचे रिलेशनशिप सोडून आली, तेव्हा पुन्हा विल स्मिथने तिला स्विकारले आणि तो तिच्यासोबत राहू लागला.
‘मेन इन ब्लॅक’, ‘बॅड बॉईज’ आणि ‘हॅनकॉक’ सारखे सर्वोत्कृष्ट चित्रपट त्याच्या नावावर आहेत. विल स्मिथला तीन मुले आहेत. ट्रे, जेडेन आणि मुलगी विलो जे सर्व आता मोठे झाले आहेत. विल पत्नी आणि मुलांसोबत सुंदर आयुष्य जगत आहे. आता तो आठवड्यातून एकदा किंवा दोनदा दारु पितो, असे त्याने एका कार्यक्रमादरम्यान सांगितले होते.
महत्वाच्या बातम्या-
प्लेऑफमधून बाहेर गेलेल्या मुंबईला आणखी एक धक्का, पुढच्या IPL मध्येही अपयशच हाती?
‘गांधी हत्या करणाऱ्या नथूरामचे समर्थन करणाऱ्यांकडून काय अपेक्षा करायच्या’; केतकीच्या प्रकरणावर आव्हाडांची पोस्ट
शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातलेल्या मोदींच्या मंत्र्याच्या पुतण्याचा गाडीवर झाड पडून मृत्यू