कलर्स मराठी वाहिनीवरील ‘बिग बॉस मराठी’ या शोचा तिसरा सीझन नुकताच संपन्न झाला. बिग बॉसचा यंदाचा सीझन चांगलाच गाजला. या शोमधील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. पण शेवटी विशाल निकम शोचा विजेता ठरला.
बिग बॉसच्या घरात असण्यादरम्यान स्पर्धक मीरा जगन्नाथ आणि जय दुधाणे वादविवादांमुळे फारच चर्चेत राहिले होते. तर आता बिग बॉस शो संपल्यानंतरही ते दोघे चर्चेत आहेत. या दोघांबाबत आता अशी माहिती समोर येत आहे की, बिग बॉस शोनंतर या दोघांच्या हाती अनेक प्रोजेक्ट्स आले आहेत.
सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट व्हायरल होत आहे. यामध्ये सांगण्यात येत आहे की, बिग बॉसचा स्पर्धक आणि गायक उत्कर्ष शिंदेचे वडिल आनंद शिंदे यांनी जय दुधाणे आणि मीरा जगन्नाथला एक ऑफर दिली आहे.
या ऑफरनुसार आनंद शिंदे यांच्या आगामी गाण्यात मीरा आणि जय झळकणार असल्याचे यामध्ये सांगण्यात येत आहे. याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळाली नसली तरी या बातमीने मीरा आणि जयचे चाहते फारच खुश आहेत.
याशिवाय बिग बॉस शोदरम्यान महेश मांजरेकर यांनी जयला एका चित्रपटाची ऑफर दिली होती. ‘शनिवार वाडा’ असे त्या चित्रपटाचे नाव असून लवकरच या चित्रपटाद्वारे जय प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
दरम्यान, विशाल निकमने बिग बॉस मराठी सीझन ३ ची ट्रॉफी जिंकत विजेतेपद आपल्या नावे केले होते. तर जय दुधाणे हा शोचा उपविजेता ठरला होता. जयने शोची ट्रॉफी जिंकली नसली तरी तो शोनंतर सर्वत्र चर्चेत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
कतरिनाने विकीच्या नावाच्या मंगळसूत्राचा फोटो केला शेअर, लोकं म्हणाली हिंदू धर्म मनापासून स्विकारलास
सख्ख्या भावाशी नाव जोडताच रवीना टंडनची उडाली होती झोप; म्हणाली कुटुंबाची राखरांगोळी…
“पाकीस्तानपासून १० मिनीटांच्या अंतरावर PM ला सुरक्षा देता येत नसेल तर तुम्हाला पदावर राहण्याचा अधिकार नाही”