राजकीय वर्तुळात सत्तास्थापनेच्या घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर गेले नऊ दिवस शांत असलेले माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची अखेर सत्तानाट्याच्या अंकात एन्ट्री झालेली आहे.
शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास सरकार अल्पमतात आल्याने सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगावे, अशी मागणी करणारे पत्र भाजपाने मंगळवारी रात्री राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सादर केले. तर दुसरीकडे गुवाहाटीमधील हलचालींनाही देखील आता वेग आला.
उद्याचा दिवस राजकीय दृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असणार आहे. याचे कारण असे की, उद्या गुवाहाटीला असलेले शिवसेनेचे बंडखोर आमदारही मुंबईत दाखल होणार आहेत. बहुमत चाचणीसाठी उद्या मुंबईत येणार असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं आहे. ते आज कामाख्या देवीच्या दर्शनाला गेले होते.
त्यावेळी माध्यमांना शिंदे यांनी ही माहिती दिली. देवदर्शनानंतर माध्यमांशी बोलताना शिंदे यांनी सांगितलं की, “मी इथे महाराष्ट्राच्या शांतीसाठी आणि समृद्धीसाठी प्रार्थना करायला आलोय. उद्या बहुमत चाचणीसाठी मुंबईला जाणार असून त्यासंदर्भातील सर्व प्रक्रिया पूर्ण करणार आहे,” असं सांगितलं.
दरम्यान, बहुमत चाचणीसाठी राज्यपालांनी उद्या विशेष अधिवेशन बोलवण्याचं पत्र राज्याचे मुख्य सचिव आणि मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवलं आहे. उद्या सकाळी ११ वाजता विशेष अधिवेशन घेण्यात येणार असून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत बहुमत चाचणी घ्यावी लागणार आहे.
तर दुसरीकडे आज शिंदे गटाकडूनही राज्यपालांना महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेतलेला असल्याचं पत्र पाठवलं जाण्याची शक्यता आहे. यामुळे आता खरी परीक्षा ही ठाकरे सरकारची आहे. राज्यात नेमकं काय घडणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
स्विमिंग करताना वाजवायचे माऊथ ऑर्गन, सोड्याच्या बाटलीपासून बनवायचे संगीत, वाचा आरडी बर्मन यांच्याबद्दल..
चित्रपटसृष्टीवर शोककळा! राहत्या घरात लटकलेल्या अवस्थेत आढळला प्रसिद्ध अभिनेत्याचा मृतदेह
उद्योगक्षेत्रातून धक्कादायक बातमी! मुकेश अंबानींनी तडकाफडकी दिला रिलायन्सचा राजीनामा
‘या’ 10 बॉलिवूड अभिनेत्री लग्नाच्या आधीच होत्या प्रेग्नेंट, एक तर लग्न न करताच झाली होती आई