Share

‘कोण म्हणतं मी म्हातारा झालो.. मी अजून थकलेलो नाही, तुमची साथ असेपर्यंत हा गाडा सुरूच राहील’

sharad pawar

निवडणुकीच्या प्रचारादरम्यान माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी “मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल”, असे म्हणत निवडणुकीचा प्रचार केला. मात्र बहुमत असून देखील भाजपला विरोधी पक्षात बसाव लागलं. याचाच धागा पकडत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी (Sharad Pawar) फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे. (will continue to work as long as people support say sharad pawar)

पक्षाच्या मेळाव्यानिमित्त उस्मानाबाद दौऱ्यावर असताना केलेल्या भाषणात फडणवीस यांच्या ‘मी पुन्हा येईन’ या वक्तव्यावर शरद पवारांना केली तूफान फटकेबाजी केली. ‘निवडणूक लागायच्या आधीच, निकाल लागायच्या आधीच मी पुन्हा येईन असं सांगत फिरत होते. पण आम्ही येऊ देतो का?”, असा सवाल पवार यांनी केला.

पुढे बोलताना पवार म्हणाले, ‘तुम्ही पुन्हा येणार नाही याची पूर्ण खबरदारी आम्ही घेतलेली आहे. ही आघाडी आता यशस्वी झाली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगलं काम करताहेत. सत्तेसाठी नाही, तर महाराष्ट्रातील जनतेसाठी ही आघाडी काम करत आहे, असं शरद पवार म्हणाले.

तसेच राज्य चालवायचे असेल राज्याचे भविष्य लोकांचे भविष्य उत्तम व्हायचे असेल तर पुढच्या काळाचा विचार करावा लागतो. देशाच्या लोकसभेत, राज्यसभेत, विधिमंडळात लोकांनी मला एकही दिवस सुट्टी दिली नाही. त्या लोकांचे भविष्य चा विचार करायची जबाबदारी माझ्यावर असल्याचे पवार यांनी सांगितले.

याचबरोबर ‘तुम्ही मला काय द्यायचं ठेवलं नाही. 4 वेळ मुख्यमंत्री, 52 वर्षांपासून निवडून देताय, पुढील काळ लोकांच्या जीवन आणि गावं समृद्ध करण्यासाठी देणार आहे, असं शरद पवार म्हणाले. कोणाला सांगताय म्हतारा झालोय जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत थकणार नाही, अस देखील पवार यावेळी बोलताना म्हणाले.

दरम्यान, ‘अनेक जण म्हणतात की मी 82 वर्षांचा झालो आहे. परंतु, मी अजून थकलेलो नाही, जोपर्यंत मला तुमची साथ आहे, तोपर्यंत राज्याच्या विकासासाठी मी काम करत राहणार आहे. उस्मानाबाद जिल्ह्याने मला खूप साथ दिली आहे. काही जण सोडून गेले आहेत. परंतु, जे गेले ते गेले, आपण काम करत राहायचे, असे पवार यांनी येथे बोलताना सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या
२४ तास पोलीसांना सुट्टी द्या, मग बघा आम्ही…; भाजप नेते नितेश राणेंचे थेट आव्हान
देवेंद्र फडणवीस हल्ल्यातून थोडक्यात बचावले; पुणे दौऱ्यात घडला ‘हा’ धक्कादायक प्रकार
शेन वॉर्नच्या निधनानंतर सुनील गावस्करांचे धक्कादायक वक्तव्य; म्हणाले, त्याच्या हृदयाला…
सहा महिन्यांपासून रिक्षावाला अल्पवयीन मुलीवर करत होता बलात्कार, ठाण्यातील धक्कादायक घटना

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now