कुटुंबातील सदस्य आपल्यातून निघून गेला की, आपल्याला त्याची किंमत समजते. प्रत्येकाला वाटतं आपली व्यक्ति पुन्हा आपल्यात यावी. मात्र नियतीचा खेळच असा की एकदा मृत पावलेली व्यक्ती आपल्यात येत नाही. जन्म – मृत्यू आपल्या हातात नसतं असं म्हणतात. ते अगदी खरं जन्म – मृत्यू म्हणजे नियतीचा खेळ.
प्रत्येकाला वाटतं की, देवाच्या कृपेने काही तरी चमत्कार व्हावा. हे सांगण्याच कारण म्हणजे, अशीच एक आश्चर्यकारक घटना आता समोर आली आहे. डॉक्टरांनी मृत घोषित केलेल्या व्यक्तीने अचानक हालचाल केल्याने डॉक्टरांच्या पायाखालची जमीन सरकली.
वाचा नेमकं घडलं काय?
ही घटना वॉशिंग्टनमधील असल्याची माहिती मिळाली आहे. रयान मार्लो असं या व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या व्यक्तीला listeria हा आजार झाला होता. उपचारासाठी गेल्या महिन्यात या व्यक्तीला एमर्जन्सी वॉर्डात दाखल करण्यात आलं होतं. मात्र डॉक्टरांनी या व्यक्तीला मृत घोषित केले.
त्याचं झालं असं, डॉक्टरांनी या व्यक्तीला 27 ऑगस्ट रोजी मृत घोषित केलं होतं. त्यांनंतर कुटुंबीयांनी एक मोठा निर्णय घेतला. कुटुंबीयांनी मार्लो यांचे अवयव डोनेट करण्याचा निर्णय घेतला. अवयव काढण्याची तयारीही झाली. मात्र तेवढ्यात या व्यक्तिच्या पायांची हालचाल झाली.
दरम्यान, पत्नीला अश्रु अनावर झाले. पत्नीने तिच्या मनातील भावना पतीला सांगण्यास सुरुवात केली. सोबतच पत्नीने पतीच्या हाताला स्पर्श केला. पत्नीने पतीकडे पाहून म्हंटलं की, ‘तुम्हाला वेड्यासारखा संघर्ष करायचा आहे. कारण मी आता ऑर्गन डोनेट करण्याची प्रक्रिया थांबवायला निघाले आहे.’
त्यानंतर डॉक्टरांमद्धे गोंधळ उडाला. डॉक्टरांना तात्काळ चाचण्या करण्यास सुरुवात केली. रीपोर्टमधून समोर आलं की, रयान ब्रेन डेड नाही. तर तो कोमात आहे. पत्नीने स्पर्श करताच रयानच्या हृदयाची धडधड वाढली. या घटनेची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.