Share

‘बायको विकणे आहे’, ‘या’ कारणामुळे नवऱ्याने बायकोच काढली विकायला; थेट जाहिरातच दिली

sale

इंटरनेटच्या माध्यमातून आता अख्ख जग आपल्या मुठीत आलं आहे. दररोज आपल्या आजूबाजूला अशा अनेक घटना घडत असतात की, अनेकदा त्या पाहून आपल्याच पाया खालची जमीन सरकते. तर काही प्रकरण ऐकून आपल्याला हसू देखील फुटतं. आता आम्ही तुम्हाला असं एक प्रकरण सांगणार आहोत की, वाचून तुम्हालाही नक्की हसू फुटेलं.

तुम्हाला कल्पना असेल की, कोणतीही वस्तु विकण्यासाठी आधी त्याची जाहीरात केली जाते. मात्र या प्रकरणात चक्क नवऱ्याने आपली धर्मपत्नीच विकायला काढली आहे. हे वाचूनच तुम्हाला धक्का बसला असेल, पण तस नाहीये हे प्रकरण अतिशय गंमतीशीर आहे.

वाचा नेमकं प्रकरण काय..? ब्रिटनमध्ये हे प्रकरण घडलं असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ब्रिटनमध्ये एक विवाहित जोडपे राहते. हे दोघे पोर्तो रिको डी ग्रॅन कॅनरिया येथे राहतात. विशेष बाब म्हणजे दोन मुलांचे हे पालक आहेत. एके दिवशी पत्नी मित्र-मैत्रिणींसोबत बाहेर गेली होती.

त्याच दिवशी पतीने सोशल मीडियावर  ‘वाइफ फॉर सेल’ या नावाने पोस्ट करत आपल्या बायकोची तुलना चक्क जुन्या कारशी केली. रॉबी मॅकमिलन असे या व्यक्तीचे नाव असून सारा असं त्या महिलीचे नाव आहे. रॉबी मॅकमिलन हे व्यवसायाने डीजे असल्याची माहिती मिळाली आहे.

रॉबी मॅकमिलन यांनी थेट पत्नी साराचा फोटो फेसबुकवर शेअर केला असून मजेशीर पोस्ट देखील लिहिली आहे. तुम्हाला वाचून धक्का बसेल पण, साराला खरेदी करण्याचे फायदे आणि तोटेही त्याने पोस्टमधून सांगितले आहे.  पुढे त्याने पोस्टमध्ये म्हंटलं आहे की, ‘ती कॉरोस लाईट आणि कॉकटेलवर धावते आणि प्रत्येक गॅलन ड्रिंकवर चांगले स्माईल देते.’

पोस्ट तुफान व्हायरल होताच पत्रकांनी त्या व्यक्तीला याबाबत विचारले असता, त्याने सांगितलं की, ‘जाहिरातीनंतर मला साराच्या विक्रीच्या काही ऑफर आल्या आहेत, पण दुर्दैवाने ती आता मार्केटमधून बाहेर आहे. पुढे रॉबी म्हणाला की, तो तिला कधीच विकणार नाही, ती लाखात एक आहे.’

दरम्यान, पतीने केलेल्या या प्रकरणावर पत्नी साराने अगदी मजेशीर प्रतिक्रिया दिलेली आहे. तुम्हाला नवल वाटेल, मात्र  स्वत: सारानेही या पोस्टवर मस्त कमेंट केली आहे. सारा म्हणाली की रॉबी खोडकर आहे. मला ती पोस्ट पाहिल्यावर मला खूप हसू आले. हे सांगण्याच कारण म्हणजे कायम अशा खोड्या करत असतो.

महत्त्वाच्या बातम्या
कान्स महोत्सवातील अमृता फडणवीसांचा लूक चर्चेत; पहा रेड कार्पेटवरचे रॅम्पवाॅकचे खास फोटो
यासिन मलिकला दिलेल्या शिक्षेवरून आफ्रिदीने गरळ ओकताच भारतीय क्रिकेटपटूने दिले सडेतोड प्रत्यूत्तर
१८ वर्षीय मुलगा रायफल घेऊन शाळेत आला आणि गोळीबार करत १९ लहान मुलांना ठार मारलं
कुख्यात दहशतवादी यासिन मलिक याला आयुष्यभर तुरूंगात सडावे लागणार; कोर्टाने दिली जन्मठेपेची शिक्षा

इतर ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now