मुख्याध्यापक पतीचा पत्नीकडून अमानूष छळ, दररोज बॅटने जबर मारहाण; व्हिडीओ व्हायरल

महिला अत्याचाराच्या अनेक घटना रोज ऐकायला मिळतात, परंतु दिल्लीत एक अजब प्रकार समोर आला आहे. राजस्थानच्या अलवार जिल्ह्यातील भिवाडीत घरगुती हिंसाचारचं प्रकरण समोर आलं आहे. त्यात एका मुख्याध्यापक असणाऱ्या पतीला त्याची बायको रोज मारहाण करत होती.

बायकोला कंटाळलेल्या मुख्याध्यापकाने पुरावे एकत्र करण्यासाठी घरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले. त्यामध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका सरकारी शाळेत मुख्याध्यापक असलेल्या अजित यादव यांनी माझी पत्नी रोज माझा छळ करते असा आरोप केला होता.

याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. अजित यांनी पुरावे गोळा करुन आता पत्नीविरोधात कोर्टात धाव घेतली आहे. आपल्याला सुरक्षा व न्याय त्याला मिळावा अशी विनंती त्यांनी कोर्टाकडे केली आहे. बायको रोज खेळण्यातल्या बॅटने, स्वयंपाक घरातला तवा, हातात मिळेलं त्या वस्तूने मारहाण करत होती, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

अधिक माहितीनुसार, अजित यांचे सुमनशी ७ वर्षांपूर्वी लव्ह मॅरेज झाले होते. ती अचानक विचित्र वागू लागली. तिने त्यांना रोज मारहाण करायला सुरुवात केली, असे त्यांचे म्हणणे आहे. या मारहाणीचे व्हिडीओही सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. या छळवणुकीचा त्यांच्या मानसिकतेवर मोठा परिणाम झाला आहे.

ते मारहाणीच्या भीतीने खुप दिवसांपासून घरी गेले नाहीत. घरापासून लपूनछपून राहत आहे. त्यांच्या कोणती गोष्ट लक्षात फार राहत नाही. आपल्या सहकाऱ्यांची नावही ते विसरतात. बायकोने एवढी मारहाण करून पण त्यांनी कधी तिच्यावर हात उचलला नाही. माझा पेशा शिक्षकाचा आहे आणि मी एका बाईवर हात उचलणं चुकीच आहे. भारतीय सभ्यतेला ते शोभणार नाही,असे ते म्हणाले.

त्यांच्या या भूमिकेचे अनेकांनी कौतुक केले आहे पण त्यांच्या पत्नीला कडक शिक्षा व्हावी अशी अनेकांची मागणी आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी या व्हिडीओवर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. पत्नीच्या अशा वागण्यामागे तिचा अमेरिकेत असणारा भाऊ पण जबाबदार आहे असा आरोप अजित यांनी केला आहे. या छळवणूकीचे सबळ पुरावे त्यांनी कोर्टाला सादर केले आहेत. त्यांना न्याय मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे.

महत्वाच्या बातम्या
सोनालीचा संस्कारी बहु’वाला अंदाज! सासरी बनवली खीर, उखाणाही घेतला, मंगळसुत्राच्या उलट्या वाट्या…
लखनऊच्या पराभवामुळे केएल राहुलवर प्रचंड भडकला गौतम गंभीर; दोघांमध्ये मैदानावरच जुंपली..
PHOTO: अनु्ष्काच्या बोल्ड फोटोंनी चाहते झाले पाणी पाणी; म्हणाले, ‘कोहली काही बोलत नाही का?’
दिलदार सलमान! ‘भाभी जी घर पर है’ चे विभूती झाले होते कंगाल, सलमानने अशी केली होती मदत