Share

नाशिकमध्ये पतीची हत्या करण्यामागे पत्नीचा आणि डोसावाल्याचा हात; ‘असा’ झाला खुलासा

नाशिक जिल्ह्यातील निफाडमध्ये पती पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. येथे आपल्या अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीने धक्कादायक पद्धतीने काटा काढला आहे. आरोपी महिलेनं प्रियकर आणि त्याच्या साथीदाराच्या मदतीने पतीचा लोखंडाच्या सळईने जीव घेतला आहे. (wife and her boyfriend kill husband)

महिलेच्या पतीची झालेली भयानक अवस्था पाहून पोलिसही हादरले आहे. गेल्या आठवड्याभराच्या तपासानंतर पोलिसांनी मारेकऱ्यांना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपी पत्नीसह तिच्या प्रियकराला अटक केली आहे. संबंधित घटनेमुळे संपुर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मृत झालेल्या तरुणाचे नाव सचिन दुसाने असे आहे. तर आरोपी महिलेचे नाव शोभा दुसाने आहे. या प्रकरणी तिचा प्रियकर दत्तात्रय शंकर महाजन असे नाव असून त्याच्यासोबत संदीप स्वामी, अशोक काळे, गोरख नामदेव जगताप, बाळासाहेब मोगरी आणि भंगार व्यवसायिक मुकरम जहीर अहमद यांना अटक करण्यात आली आहे. हे आरोपी निफाडचेच रहिवासी आहे.

मृत सचिन दुसाने आणि आरोपी शोभा दुसाने हे पती-पत्नी होते. मृत सचिन याला दारुचे व्यसन होते. दारु प्यायल्यानंतर तो अनेकदा आपल्या पत्नीला शिवीगाळ करायचा आणि त्रास द्यायचा. याच रागातून आरोपी पत्नीने पतीला कायमचा संपवायचा निर्णय घेतला.

शोभाने आपला प्रियकर दत्तात्रय महाजनच्या मदतीने पतीच्या हत्तेचा कट रचला. त्यामुळे निफाडमधील काही लोकांना एक लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती. त्यामध्ये एक रिक्षावाला होता, तर एकजण हा डोसावाला होता. २३ जानेवारी रोजी मारेकऱ्यांनी सचिनची राहत्या घरी हत्या केली आहे. यावेळी पत्नीने आणि तिच्या सहकाऱ्यांनी त्याची लोखंडाच्या सळईने मारुन मारुन हत्या केली.

त्यानंतर त्यांनी मिळून त्याचा मृतदेह त्याच्या डस्टर कारमध्ये टाकला. त्यानंतर त्यांनी ही कार पेठजवळच्या कोटंबी घाटात आणली. तेथील दरीत मृतदेह टाकला होता, तसेच सर्व पुरावे मिटवण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. पण सचिनचा मृतदेह झाडाला लटकल्यामुळे हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे.

महत्वाच्या बातम्या-
मुकेश अंबानींनी घेतली जगातील सगळ्यात सुरक्षित एसयूव्ही, किंमत वाचून तोंडात बोटं घालाल
VIDEO: आकाश ठोसरसोबत डेटच्या चर्चांनंतर रिंकूने पोस्ट केले खास reel, चाहते झाले घायाळ
घाबरले म्हणणाऱ्यांना नितेश राणेंचे जोरदार प्रत्यूत्तर; अटक करणाऱ्यांना पुन्हा दिली थेट धमकी

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now