Share

भारतीय संघ नेहमी निळ्या रंगाचीच जर्सी का घालतो? वाचा भारतीय संघाचा इतिहास

भारतात सर्वात जास्त लोकप्रिय खेळ हा क्रिकेट आहे. क्रिकेटवर अनेकदा चर्चा होत असते. सध्या आयपीएल सुरु आहे तर सगळेजण आयपीएलची चर्चा करत आहे. आयपीएलमध्ये संघ त्यांच्या जर्सीचा रंग बदलत असतात. अशात काही लोकांना असाही प्रश्न पडला असेल की भारतीय संघाच्या जर्सीचा का रंग बदलत नाही? भारताच्या जर्सीचा रंग नेहमीच निळाच का असतो? आज आपण तेच जाणून घेणार आहोत. (why team india always wear blue jersey)

केवळ क्रिकेट संघातच नाही तर फुटबॉल आणि हॉकीमध्येही भारतीय संघ फक्त निळ्या जर्सीतच दिसतात. फुटबॉल आणि हॉकीमध्येही संघ अनेकदा पांढरी आणि पिवळी जर्सी परिधान करताना दिसला असला तरी मुख्य रंग निळा आहे. खरं सांगितलं तर हा रंग राष्ट्रध्वजातील तिरंग्यात असलेल्या अशोक चक्रातून घेण्यात आला आहे.

भारतीय संघाने ऑरेंज जर्सी १९८५ च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये घातली होती. जर्सीवर भगवे, पांढरे आणि हिरव्या रंगाचे पट्टे होते. भगवा रंग शौर्याचे प्रतीक आहे आणि हिरवा रंग आनंदाचे प्रतीक आहे आणि पांढरा रंग शांततेचे प्रतीक आहे. त्यामुळे वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ती जर्सी घालण्यात आली होती. पण त्यानंतर ती बदलण्यात आली.

भारतातील अनेक राजकीय पक्ष त्यांच्या प्रतिनिधीत्वाशी भगवा रंगही जोडत असतात. तर पांढऱ्या रंगाची जर्सी टी २० आणि एकदिवसीय सामन्यात योग्य दिसत नाही. तसेच पाकिस्तानने आधीच त्यांच्या संघाला हिरव्या रंगाची जर्सी दिली आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही प्रकारचा वाद टाळण्यासाठी अशोक चक्राचा निळा रंग भारतीय संघाच्या जर्सीला देण्यात आला.

भारतीय जर्सीत पिवळ्या रंगाचाही समावेश करण्यात आला होता. १९९२ च्या विश्वचषकापासून क्रिकेटमध्ये भारतीय संघ निळ्या आणि पिवळ्या रंगामध्ये दिसून आली होती. यामध्ये भारत हे पिवळ्या रंगात लिहिले होते. १९९६, १९९९ च्या जर्सीमध्येही निळ्या जर्सीमध्ये पिवळा रंग होता.

२००३ च्या विश्वचषकातही भारत निळ्या जर्सीत होता, तर जर्सीच्या पुढे तिरंग्याचे रंग होते. तेव्हापासून हळूहळू भारताच्या जर्सीतून पिवळा रंग नाहीसा होत गेला आणि भारतीय संघाची जर्सी पुर्णपणे निळ्या रंगाची झाली. तसेच पुर्ण जर्सी जरी निळ्या रंगाची असली तरी त्याला ऑरेंज किंवा पांढऱ्या रंगाची शेडींग दिली जाते.

महत्वाच्या बातम्या-
लखनऊच्या ‘या’ स्टार खेळाडूची संघातून होऊ शकते हकालपट्टी; तिन्ही सामन्यात ठरलाय सुपरफ्लॉप
महिलेने टिकली लावल्यामुळे पोलिस कर्मचाऱ्याचे लाजीरवाणे कृत्य; शिवीगाळ करत महिलेला…
राजू शेट्टींचा ‘एकला चलो’चा नारा; महाविकास आघाडीला ठोकला रामराम, केली मोठी घोषणा

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now