Share

”मला बिचारी म्हणणाऱ्या भाजपने मला उमेदवारीची ऑफर का दिली?”

jadhav - patil

सध्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. प्रचारादरम्यान सत्ताधारी-विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून या ठिकाणी दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

तर भाजपकडून सत्यजित कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या निवडणुकीत शिवशक्ती सेनेच्या प्रमुख करुणा शर्मा यांनी देखील उडी घेतली आहे. काही दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी काँग्रेसपुढे एक मोठा प्रस्ताव ठेवला होता.

कोल्हापूर पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बोलताना पाटील म्हणाले होते की, ”कोल्हापूर पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेसकडून जयश्री जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. जयश्री जाधव या भाजपच्या होत्या त्यांना परत भाजपमध्ये पाठवा. मी ‘एबी फॉर्म’ बदलतो आणि ही निवडणूक बिनविरोध करतो,” अशी थेट ऑफर त्यांनी दिली होती.

तसेच प्रचारादरम्यान बोलताना भाजप नेत्यांनी जयश्री जाधव यांना बिचारी असे संबोधले होते. याचाच धागा पकडत जयश्री जाधव यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ‘हिमतीने मी निवडणूक लढवत आहे. मात्र, मला बिचारी म्हणणार्‍या भाजपने मला उमेदवारीची ऑफर का दिली? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.

शिवाजी पेठेतील पद्माराजे परिसरातील मतदार संवादावेळी त्या बोलत होत्या. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, ‘भाजपकडून लढल्यास कार्यक्षम आणि महाविकास आघाडीकडून लढल्यास बिचारी, असा फरक माझ्यासारख्या महिलेबाबत का? असा थेट सवाल जयश्री जाधव यांनी भाजपला केला.

दरम्यान, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल कोल्हापुरात महाविकास आघाडीतील नेत्यांची संयुक्त सभा पार पडली. या सभेला आघाडीतील अनेक नेते मंडळी उपस्थित होते. कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जयंत पाटील, सतेज पाटील तसेच राजेश क्षीरसागर हे देखील उपस्थित होते.

कार्यकर्त्यांना संबोधित करताना थोरात म्हणाले, ‘ही सभा पाहिल्यावर 50 हजारापेक्षा जास्त मतांनी जयश्रीताई निवडून येतील याची खात्री झाली, असे थोरात म्हणाले. जयश्री ताईंना निवडणून देणं म्हणजे ताराराणींना अभिवादन आहे हे लक्षात घ्या, असे आवाहनही थोरात यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या
मोठी बातमी! ‘हे’ कारण देत पालघर साधू हत्याकांडातील दहा आरोपींना उच्च न्यायालयाने दिला जामीन
‘युपीए’च्या अध्यक्षपदासाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा; मात्र प्रकाश आंबेडकरांनी सुचवलं ‘हे’ नाव!
‘जयश्री जाधव 50 हजार मतांनी निवडून येतील, कोल्हापुरात नमो नमो चालणार नाही’
भाग्यश्रीवर बराच काळ नाराज होता तिचा पती, सासरवाडीला घडलं होतं असं काही की.., वाचा किस्सा

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now