Share

शर्माजी नमकीनच्या पोस्टरमध्ये दोन हिरो का दिसतात? किस्सा वाचाल तर व्हाल भावूक

अ‍ॅमेझॉन प्राईमवर नुकताच रिलीझ झालेला शर्माजी नमकीन एक परफेक्ट एन्टरटेनिंग चित्रपट आहे. स्वयंपाकघरात लुडबूड करणारे, वेगवेगळे पदार्थ अगदी प्रेमाने आणि सहजपणे बनवून इतरांना खाऊ घालणारे शर्माजी या चित्रपटात आपल्याला बघायला मिळतात. पण चित्रपटाचे पोस्टर बघितले हे शर्माजी म्हणजे नक्की कोण हा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही.

नुकत्याच ओटीटीवर रिलीझ झालेल्या या चित्रपटात जुही चावला, सतिश कौशिक यांच्याही भूमिका आहेत. दोन मुलांसोबत राहणारा विधूर बाप आपल्या निवृत्तीनंतरचा काळ आनंदात आणि कामात व्यस्त राहून व्यतीत करण्याच्या धडपडीत काय काय नविन गोष्ट करतो, याची ही गोष्ट आहे.

या पोस्टरमध्ये एकसारख्या वेशभूषेत परेश रावल आणि ऋषी कपूर दोघेही दिसतात. अगदी ट्रेलरमध्येही सीन्समध्ये आलटून पालटून शर्माजी दिसतात. त्याचे झाले असे की, शर्माजी नमकीन चित्रपटाचे कास्टींगमध्ये ऋषी कपूर मुख्य भूमिकेत दिसणार होते. परंतु, शूटींग सुरु असताना ऋषीजींना कॅन्सरचे निदान झाले. आणि प्रदीर्घ उपचारानंतर त्यांचे निधन झाले.

यानंतर अर्धवट राहिलेला चित्रपट रणबीर कपूरने प्रोस्ठेटीक मेकपच्या आधारे ऋषी कपूर यांच्यासारखे दिसून पूर्ण करावा अशी सगळ्यांची इच्छा होती. परंतु, काही कारणाने हा चित्रपट रणबीर पूर्ण करु शकणार नव्हता. अशावेळी या चित्रपटासाठी परेश रावल यांना विचारण्यात आले. आणि त्यांनी तात्काळ होकार दिला. अशारितीने त्यांनी हा चित्रपट पूर्ण करत हा चित्रपट प्रेक्षकांसाठी प्रदर्शित करण्यात आला.

शर्माजी नमकीन हा चित्रपट म्हणजे ऋषी कपूर यांच्या चित्रपट कारकीर्दीतला शेवटचा चित्रपट असल्याकारणाने त्यांचाही समावेश पोस्टरमध्ये करण्यात आला आहे. हा चित्रपट पूर्ण करुन आदरांजली वाहण्यात आली आहे. ऋषी कपूर यांच्या चाहत्यांना हा चित्रपट म्हणजे एक पर्वणीच आहे.

महत्वाच्या बातम्या
हत्या करून मृतदेह लोखंडी पाईपला लटकावला; धक्कादायक घटनेनं पुणे हादरलं!
‘तेरे बिना नही जिना…’ लिहून इंजिनियर तरुणाने केला हृदयद्रावक शेवट; औरंगाबादेतील मन हेलावणारी घटना
मुलगाच झाला आईचा वैरी! पत्नीच्या ‘या’ हट्टापाई जन्मदात्या आईला ढकललं नदीत, पोलिसही झाले निशब्द
“होय, जातीपातीच्या राजकारणाला शरद पवारच जबाबदार”, जनतेचा राज ठाकरेंच्या वक्तव्याला पाठिंबा

ताज्या बातम्या बाॅलीवुड

Join WhatsApp

Join Now