Share

आजची रात्र एवढी महत्वाची का मानली जाते? महाशिवरात्रीला काय घडलं होतं?

महाशिवरात्री  म्हणजे ‘शिवाची महान रात्र’. भारतीय लोकांसाठी महत्वाचा सोहळा. ही रात्र एवढी महत्वाची का आहे जाणून घेऊ.भारतीय संस्कृतीत अनेक सण साजरे केले जातात. प्रत्येक सणाचे काहीना-काही महत्वाचे कारण आहे.
वेगवेगळे उदेद्श डोळ्यासमोर ठेवून  सण साजरे केले जातात, जसे की विविध ऐतिहासिक घटना, विजय किवा जीवनातील विशिष्ट परिस्थिती. उदा.- पेरणी,लावणी,कापणी,यासाठी सण साजरे केले जातात. परंतु महाशिवरात्रीचे वेगळेच महत्व आहे.

प्रत्येक महिन्यातील  १४ वा दिवस किवा प्रतिपदेच्या आधीचा दिवस शिवरात्री म्हणून ओळखला जातो. परंतु वर्षभरात येणाऱ्या शिवरात्री मध्ये फेब्रुवारी-मार्चमध्ये येणाऱ्या शिवरात्रीला सर्वात अधिक महत्व आहे. या रात्री पृथ्वीच्या उत्तर गोलार्धाच्या स्थितीमुळे मनुष्यात नैसर्गिक उर्जेचा उद्रेक होतो, याच उर्जेला योग्य दिशा मिळण्यासाठी रात्रभर उत्सव साजरा केला जातो.

काही लोक हा दिवस शंकराच्या लग्नाचा वाढदिवस म्हणून साजरा करतात, तर काही महत्वाकांशी लोक हा दिवस शिवाने सर्व शत्रूवर मत केली म्हणून साजरा करतात.योगी व्यक्तीसाठी हा दिवस शिव कैलास पर्वताशी एकरूप झाले म्हणून साजरा करतात.

योग परंपरेत शिव देव म्हणून पूजले जात नाहीत तर ते आदिगुरु म्हणजेच योग विज्ञान उगम  पावलेले प्रथम गुरु मानले जातात.हजारो वर्ष ध्यान केल्यानंतर एके दिवशी ते अत्यंत स्थिर बनले तो दिवस महाशिवरात्रीचा दिवस होय, म्हणून महाशिवरात्रीकडे स्थैर्याची रात्र या दृष्टीने पाहिले जाते.

महाशिवरात्रीचे व्रत का करावे-  शिवाच्या विश्रांतीच्या (ध्यान ) काळात शिवतत्वाचे कार्य थांबते म्हणजेच त्या दिवसात शिव ध्यान अवस्थेतून समाधी अवस्थेत जातात. शिवाची समाधी अवस्था म्हणजे शिवाने स्वत:साठी साधना केलेला काळ. या काळात विश्वामध्ये वाईट शक्तींचा दाब प्रचंड वाढतो, याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून महाशिवरात्रीचे व्रत करावे.

महाशिवरात्रीचे व्रत करण्याची पध्दत व विधी-  उपवास, पूजा व जागरण ही या व्रताची ३ अंगे आहेत. शिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरी पूजा करावी याला ‘यामपूजा’ म्हणतात.या पूजेत देवाला अभ्यंगस्नान घालावे, नंतर बेल, पांढरी फुले व रुद्राक्ष माळा शिवपिंडीवर वाहव्यात. धोत्रा व आंब्याची पानेही या पूजेत वाहतात.

तांदळाच्या पीठाचे २६ दिवे करून शिवाला ओवाळावे. पूजेच्या शेवटी १०८ दिवे दान दयावेत. शिवस्मरणात जागरण करावे. पाहटे स्नान करून पुन्हा पूजा करावी. ब्राह्मण भोजन घालावे व त्यांचा आशीर्वाद घ्यावा. शिवपुजेची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे-

शिवपिंडीला थंड पाणी, दूध किवा पंचामृत यांनी स्नान घालतात.
शिवाच्या पूजेत हळदी कुंकू वापरत नाही. मात्र भस्म वापरतात.
शिवपूजेला पांढऱ्या अक्षता वापरतात.
शिवाला तांदूळ, तीळ व पांढरी फुले वाहतात.
शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्धचंद्राकृती प्रदिक्षणा घालतात.

महाशिवरात्रीला शिवाचा नामजप करण्याचे महत्त्व – महाशिवरात्रीला  वाढणाऱ्या तमोगुणापासून (वाईट शक्तींपासून) रक्षण करण्यासाठी भगवान शंकराचा ‘ओम नम: शिवाय’ हा नामजप करावा ज्यामुळे तमोगुणांपासून तुमची सुटका होईल.

महत्वाच्या बातम्या
…त्यामुळे मुस्लिमांकडून मतदानाचा हक्क काढून घ्या, भाजप नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य
‘डॉक्टर हरामखोर आणि आपटून मारायच्या लायकीचे आहेत’, संभाजी भिडेंचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य
रशियाचा कट्टर समर्थक असलेला ‘हा’ देश उतरला युक्रेनच्या विरोधात; अण्वस्त्रे तैनात केल्यामुळे युक्रेनचं टेन्शन वाढलं
रशियाचा कट्टर समर्थक असलेला ‘हा’ देश उतरला युक्रेनच्या विरोधात; अण्वस्त्रे तैनात केल्यामुळे युक्रेनचं टेन्शन वाढलं

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now