देशाच्या गाणकोकिळा लता मंगेशकर (lata mangeshkar) यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. देशासह जगभरातील श्रोत्यांच्या जगण्याला अमृतसंजीवनी देत आलेला स्वर्गीय सूर हरपल्यानं आज संपूर्ण देश शोकाकूल झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून लतादीदी (Lata Didi) यांना आजारी असल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. (why lata mangeshkar never married)
आज अखेर भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी वयाच्या ९२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात त्यांच निधन झाले आहे. मंगेशकर यांना ८ जानेवारीला करोनाची लागण झाली होती. त्यांना करोनाची सौम्यं लक्षणं जाणवत होती. त्यांना न्यूमोनियाचीही लागण झाल्याचं समोर आलं होतं.
भारतीय चित्रपटश्रुष्टीला शंभर वर्ष पुर्ण झाली. त्यातील ७० वर्ष हे लता दिदींच्या गाण्यांनी सजलेली आहेत. भारताच्या कोकीळा म्हणून लता दिदींची ओळख आहे. दिनानाथ मंगेशकर हे लता दिदींचे वडील आहेत. तर आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची सख्खी भावंडे आहेत.
लता मंगेशकर यांचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ ला मध्येप्रदेशमध्ये झाला. लता दिदींनी त्यांच्या वडीलांकडून संगिताचे धडे घेतले आहेत. वयाच्या पाचव्या वर्षी त्यांनी त्यांच्या संगीत प्रवासाची सुरुवात केली. १९४२ मध्ये दीदींचे वडील दीनानाथ मंगेशकर यांचे निधन झाले.
त्यावेळी लता दीदी ह्या तेरा वर्षांच्या होत्या. वडीलांनंतर कुटूंबाची संपूर्ण जबाबदारी लता दिदींवर आला होती. नवयुग चित्रपट कंपनीचे मालक मास्टर विनायकने त्यांच्या कुटूंबाची संपुर्ण जबाबदारी घेतली. लता दिदींनी गायिका आणि अभिनेत्री म्हणून त्यांचा प्रवास सुरु केला.
त्यावेळी लता दिदींनी त्यांच्या भावंडासाठी आई आणि वडील अशा दोन्ही भुमिका पार पाडल्या. त्यांनी त्यांच्या संपूर्ण परीवाराची जबाबदारी पार पाडली. म्हणून त्यांनी चित्रपटांमध्ये गायिका म्हणून त्यांचा प्रवास सुरु केला. लता दिदींनी कधीही मागे न बघता आपले कार्य सुरु ठेवले. त्यांनी आत्तापर्यंत ३० पेक्षा अधिक भाषांमध्ये गायन केले आहे. लता दिदींनी सर्वात जास्त गाणी गायली म्हणून त्यांची गिनीज बुक ऑफ रोकॉर्डमध्ये नोंद आहे.
२००१ साली त्यांना भारतरत्न आणि महाराष्ट्र भूषण असे अनेक पुरस्कार मिळाले. लता दिदींना चित्रपटातील गायनासाठी अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी अनेक भाषांमधून गाणी गायली आणि एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला होता. त्यांच्या गाण्याची जादू आजही कायम आहे आणि ती जादू पुढे अनेक वर्ष कायम राहणार आहे. दिदींनी तीसहून अधिक भाषांमध्ये चित्रपट आणि नॉन-फिल्मी गाणी गायली आहेत.
चित्रपट गायनात लता दिदींसोबत त्यांची बहीण आशा भोसले यांचे सर्वात मोठे योगदान आहे. लता दिदी अविवाहित आहेत. त्यांनी लग्न केले नाही. त्यांच्या आवाजाचे आजही लाखो चाहते आहेत. त्यांची गाणे आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात.
असे बोलले जाते की, लता मंगेशकरचे राजपूरच्या डोंगर घराण्यातील राज सिंगवर प्रेम होते. अनेक वर्षे या दोघांचे नाते होते. पण त्या दोघांना कधी लग्न करता आले नाही. कारण राज सिंगने त्यांच्या वडिलांना शब्द दिला होता की, ते कधीही सामान्य घरातील मुलीशी लग्न करणार नाहीत.
त्याकाळी राजघराणे आणि सामान्य कुटुंब यांच्यामध्ये खूप जास्त अंतर होते. म्हणून राज सिंगने त्यांच्या वडिलांना दिलेला शब्द कधी तोडला नाही. त्यांनी स्वतः देखील आयुष्यभर लग्न केले नाही. ते अविवाहित होते. पण या दोघांची मैत्री मात्र शेवटपर्यंत कायम होती.
महत्वाच्या बातम्या
लता मंगेशकर यांच्या निधनानंतर केंद्राकडून दोन दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर, जाणून घ्या काय असतो राष्ट्रीय शोक?
स्कूटरवरुन परीक्षेला जात असताना चायनीज मांजात अडकून विद्यार्थिनीची मानच कापली
विमान देखील उतरू शकतील असे 20 रस्ते मी देशात बांधले – नितीन गडकरी
मुख्यमंत्री अडकणार? उद्धव ठाकरेंविरोधात किरीट सोमय्या हत्येचा गुन्हा दाखल करणार
एकदा लता मंगेशकर यांना एका व्यक्तीने दिले होते विष, मरता मरता वाचल्या होत्या दीदी, वाचा किस्सा