Share

सुनील गावस्कर का म्हणाले, कोहलीचे नशीब चमकणार, २०२२ घेऊन येणार त्याच्यासाठी गुडलक?

विराट कोहलीचा फॉर्म सध्या खराब चालला आहे पण आता त्याचे नशीब बदलण्याची वेळ आली आहे, असे मत भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले. सेंच्युरियनमध्ये टीम इंडियाच्या ऐतिहासिक विजयानंतर त्याने आशा व्यक्त केली की, 2022 कोहलीसाठी गुडलक घेऊन येईल आणि पुन्हा एकदा कोहलीची बॅट रनांचा पाऊस पडताना दिसणार.

गुरुवारी सेंच्युरियन येथे भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर अधिकृत प्रसारकाशी झालेल्या संभाषणात गावस्कर म्हणाले की, विराटच्या फलंदाजीत उणीव भासत नाही. मला विश्वास आहे की फक्त नशीब त्यांना साथ देत नाही. गावस्कर म्हणाले, ‘विराटच्या फलंदाजीत कोणतीही कमतरता नाही. नशीब सोबत नसल्याने त्याला धावा करता येत नाहीत.’

माजी कर्णधार म्हणाला की, प्रत्येक फलंदाज चुका करतो, पण नशीब त्याच्यासोबत असते त्यामुळे फलंदाजही टिकतो. तो धावा करत राहतो, पण कोहलीला नशीब काही साथ देत नाही. तो चुकतोय आणि त्यावरच आऊट होऊन बाहेर पडतो. 2022 हे वर्ष कोहलीसाठी गुडलक घेऊन येईल, अशी आशा गावसकर यांनी व्यक्त केली.

उल्लेखनीय म्हणजे की, त्याने 2021 चा शेवट 11 कसोटी सामन्यांमध्ये 28.21 च्या माफक सरासरीने 536 धावांसह केला. त्याने 2019 मध्ये बांगलादेशविरुद्ध शेवटचे शतक झळकावले होते. विराटने 2021 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये 19 डावांमध्ये केवळ चार अर्धशतके झळकावली होती.

भारतीय कर्णधाराने 23 नोव्हेंबर 2019 रोजी अखेरचे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले होते. त्यानंतर इडन गार्डन्सवर बांगलादेशविरुद्धच्या डे-नाईट कसोटीत त्याने 136 धावांची मॅच-विनिंग इनिंग खेळली. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला जगभरातील कसोटी सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला असला तरी दक्षिण आफ्रिकेतील सेंच्युरियन जिंकण्यात भारतीय संघाला यश मिळू शकले नाही.

या विजयासह विराट कोहली आशियातील पहिला आणि जगातील केवळ तिसरा कर्णधार ठरणार आहे, ज्याच्या नेतृत्वाखाली त्याच्या संघाने सेंच्युरियनचे मैदान जिंकले आहे. याआधी ऑस्ट्रेलियाच्या नासिर हुसेन आणि मायकेल क्लार्क यांनाच या मैदानावर आपल्या संघाला विजय मिळवून देता आला आहे.

विराट कोहली हा पहिला भारतीय कर्णधार बनला आहे ज्याने त्याच्या नेतृत्वाखाली बॉक्सिंग डे कसोटी सामना दोनदा जिंकला आहे. या सामन्यापूर्वी त्याने 2018 साली मेलबर्नमध्ये बॉक्सिंग डे कसोटी जिंकली होती. अशी कामगिरी करणारा तो भारतातीलच नव्हे तर आशियातील पहिला कर्णधार ठरला आहे.

महत्वाच्या बातम्या :-
‘बर्गर आणला नाही तर संपूर्ण घर पेटवून देईल’, भुकेल्या मुलाची धमकी ऐकून वडिल पोहोचले थेट कोर्टात
कोरोनामध्ये लग्न रद्द झाल्यास मिळणार १० लाखांचा विमा, जाणून घ्या काय आहे ही स्कीम
धक्कादायक! वैष्णोदेवी मंदिर परिसरात चेंगराचेंगरी; १२ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी

खेळ

Join WhatsApp

Join Now