Homeक्राईम'बर्गर आणला नाही तर संपूर्ण घर पेटवून देईल', भुकेल्या मुलाची धमकी ऐकून...

‘बर्गर आणला नाही तर संपूर्ण घर पेटवून देईल’, भुकेल्या मुलाची धमकी ऐकून वडिल पोहोचले थेट कोर्टात

तुम्ही अनेकदा पाहिलं असेल कि माणसाला भूक लागल्यानंतर तो किती चिडचिड करतो. भूक लागल्यावर लोक कोणत्याही थराला जातात. एखाद्या व्यक्तीला राग येऊ लागतो तर कधीकधी तो योग्य आणि अयोग्य यातील फरक विसरतो. भुकेमुळे एका व्यक्तीला इतका राग आला की त्याने वडिलांना बर्गरच्या बदल्यात त्यांचे घर जाळून टाकण्याची धमकी दिली.

मलेशियातून हे प्रकरण समोर आले आहे. २७ डिसेंबर रोजी मलेशियातील बाटू केव्हजमध्ये राहणाऱ्या २९ वर्षीय अदीबने त्याच्या वडिलांना बर्गर आणण्यास सांगितले. पण यानंतर त्याने जी धमकी दिली, त्यामुळे लोक आश्चर्यचकित झाले, त्याने फोनवर स्पष्टपणे सांगितले की, जर त्याच्या वडिलांनी आता त्याच्यासाठी बर्गर आणला नाही तर तो संपूर्ण घर पेटवून देईल.

मलेशियन मीडिया बेरनामाने दिलेल्या माहितीनुसार, अदीबच्या वडिलांनी त्याच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. यानंतर अदीबला २८ डिसेंबरला अटक करण्यात आली. कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान अदीब एका महिन्यात केवळ १७ हजार रुपये कमावत असल्याचे आढळून आले.

अदीबच्या बचाव पक्षाच्या वकिलाने सांगितले की, त्याच्या अशिलाला एका महिन्यात फारच कमी कमाई होत असल्याने त्याला कमी शिक्षा द्यावी. मात्र, अदीबच्या वडिलांच्या वकिलाने सांगितले की, मुलाने आपल्याच वडिलांना अशा धमक्या दिल्याबद्दल त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्याला सदैव आठवण राहील अशा पद्धतीने त्याला शिक्षा झाली पाहिजे.

लोकांनी या प्रकरणातून शिकले पाहिजे की तुम्ही तुमच्या वडिलांचा आदर करा आणि अशा धमक्या देऊ नका. सुनावणीनंतर न्यायदंडाधिकाऱ्यांनी अदीबला पाच महिन्यांची शिक्षा सुनावली. बर्गरची मागणी करणाऱ्याला ५ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाल्याची बातमी व्हायरल होत आहे.