Vad : सध्या रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) आणि जेनेलिया यांचा मराठी चित्रपट वेड (Ved) हा चांगलाच चर्चेत आहे. हा चित्रपट 30 डिसेंबरला प्रदर्शित झाला आहे. तरीही हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहाबाहेर तूफान प्रेक्षक गर्दी करत आहेत.
जेनिलीयाने या चित्रपटातून मराठीमध्ये पदार्पण केलं आहे. तर रितेशचा हा दिग्दर्शक म्हणून पहिलाच मराठी चित्रपट आहे. या सेलिब्रिटी कपलने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. रितेश जेनेलिया कित्येक वर्षानंतरसोबत काम करताना दिसून येत आहे.
‘वेड’ चित्रपटाच्या तुलनेत इतर बॉलिवूड चित्रपटांची जादू मात्र फिकी पडली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत तब्बल 23 कोटींचा गल्ला आपल्या खात्यात जमा केला आहे. तर हा चित्रपट तब्बल 100कोटींचा पल्ला गाठेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
वेड चित्रपटाला प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल रितेश देशमुखने प्रेक्षकांचे आभार मानले आहे. या चित्रपटाचे प्रेक्षक तोंडभरून कौतुक करत आहेत. मात्र, दुसरीकडे जेनेलियाला धड मराठी सुद्धा बोलता येत नाही अशी. टीका सुद्धा केली जात आहे.
अभिनेत्री जेनेलियाच्या जागी दुसर्या अभिनेत्रीला जागा का नाही दिली , असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. जेनेलियाचा अभिनय अप्रतिम आहे, मात्र मराठी भाषेवर तिचे फारसे प्रभुत्व नाही, असे म्हटले जाते आहे. त्यानंतर जेनेलियाला ही भूमिका का दिली? असा प्रश्न रितेश देशमुखला विचारण्यात आला आहे.
याचे उत्तर देताना रितेश म्हणाला की, जेनेलियाने आतापर्यंत विविध भाषेतून काम केल आहे. तिची महाराष्ट्रची सून म्हणून एक वेगळीच ओळख आहे. तिची खुप पुर्वीपासून इच्छा होती की, मुख्य भूमिका असलेला एका तरी मराठी चित्रपट करायचा. आणि म्हणूनच तिने वेड चित्रपटात श्रावणीची भूमिका साकारली.
तसेच, या चित्रपटात श्रावणीचे पात्र लोकांना आपलंसं वाटल पाहिजे म्हणून तिने स्वतः या भूमिकेला आवाज दिला आहे त्यावर रितेश म्हणतो की, या परीक्षेत देखील जेनेलिया पास झाली आहे. जेनेलियाचा हा उत्तम अभिनय पाहून लोक पुन्हा पुन्हा हा चित्रपट पाहत आहेत.
महत्वाच्या बातम्या-