शिवसेना मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी केली आहे. ते मंगळवारी दिवसभर गुजरातमध्ये होते, पण ते आता आसामकडे रवाना झाल्याचे म्हटले जात आहे. तसेच त्यांच्यासोबत शिवसेनेचे ३५ आमदार असल्याचे म्हटले जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. (why cabinet minister sandipan bhumre support eknath shinde)
अशात बंडखोरी करणारे शिवसेनेचे काही मंत्री चांगलेच चर्चेत आले आहे. त्यातलेच एक म्हणजे संदीपान भुमरे. भुमरे हे आधी स्लीप बॉय होते, पण त्यानंतर ते पाचवेळा आमदार झाले आणि नंतर ते थेट कॅबिनेट मंत्री झाले. पण शिवसेनेने इतके देऊनही त्यांनी गद्दारी का केली? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पायी चालणारे कार्यकर्ते पुढे आमदार झाले त्यातलेच एक नाव संदीपान भुमरे यांचेही होते. ते सध्या रोजगार हमी योजनेचे मंत्री आहे. ते सुरुवातीला पैठणच्या संत एकनाथ साखर कारखान्यात स्लीप बॉय म्हणून कामाला होते. शिवसेनेमुळे भविष्यात ते त्याच कारखान्याचे चेअरमन झाले.
भुमरे यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात पाचोड ग्रामपंचायीपासून केली होती. पुढे सभापती झाले नंतर साखर कारखान्याचे चेअरमन आणि नंतर पैठण मतदार संघातून आमदार झाले. तसेच ते तब्बल पाचवेळा पैठण मतदार संघातून आमदार झाले. तसेच महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांना कॅबिनेट मंत्रीपद सुद्धा दिले.
तसेच भुमरे यांचे चिरंजीव विलास भुमरे यांना जिल्हा परिषदेत बांधकाम सभापती आता विधानसभेची उमेदवारी असे नियोजन सुरु होते. असे असतानाही भुमरे हे एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडात का सामीला झाले? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच त्यांच्या या बंडामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनाही धक्का बसला आहे.
संदीपान भुमरे यांनी शिवसेनेशीच बंड केल्यामुळे शिवसैनिक अस्वस्थ झाले आहे. तसेच अनेकांनी यावर प्रतिक्रियाही दिली आहे. भुमरे साहेबांना शिवसेनेने काय कमी पडू दिले? असा सवाल शिवसैनिकांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
महत्वाच्या बातम्या-
ठाकरे सरकार कोसळणार? एकनाथ शिंदे ४० आमदारांना घेऊन सुरतहून गुवाहाटीमध्ये दाखल
गुजरातला गेल्यानंतर एकनाथ शिंदेंनी पहिल्यांदाच साधला पत्रकारांशी संवाद, पहा नक्की काय म्हणाले?
अखेर एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री ठाकरेंमध्ये झाली चर्चा; वाचा दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं