Share

१०० वर्षांपेक्षा जास्त वर्षे झाले, तरी ब्लेडचे डिझाइन आजही तसेच का आहे माहितीये का?

दाढी करण्यापासून केस कापण्यापर्यंत सगळीकडेच ब्लेडचा वापर केला जातो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की ब्लेड केवळ विशिष्ट डिझाइनमध्येच का बनवले जाते. ब्लेड बनवणार्‍या अनेक कंपन्या आहेत पण कोणीही त्याचे डिझाइन का बदलले नाही? खरंतर यामागचं कारण आहे ब्लेड बनवायला सुरुवात केलेली जिलेट कंपनी. (why blade design is always same)

जिलेट कंपनीचे संस्थापक किंग कॅम्प जिलेट यांनी १९०१ मध्ये त्यांचे सहकारी विल्यम निकर्सन यांच्यासोबत ब्लेडचे एक विशिष्ट डिझाइन तयार केले होते. त्या वेळी ब्लेडचे जे डिझाइन केले होते तेच डिझाइन आजही आहे. डिझाइन बनवल्यानंतर, किंग कॅम्प जिलेटने त्याचे पेटंट घेतले आणि १९०४ मध्ये उत्पादन सुरू केले.

१९०१ मध्ये, जिलेट ही एकमेव कंपनी होती जिने रेझर आणि ब्लेड बनवायला सुरुवात केली. त्यावेळी रेझरमधील ब्लेड बोल्टद्वारे बसवावे लागत होते. म्हणून, ब्लेडच्या मध्यभागी एक विशेष रचना तयार केली गेली होती. जिलेटने प्रथम ब्लू जिलेट नावाने ब्लेडची निर्मिती केली होती.

१९०४ मध्ये प्रथमच १६५ ब्लेड बनवण्यात आले. पुढे ब्लेड बनवणार्‍या इतर कंपन्याही आल्या पण त्यांनी ब्लेडची जुनीच डिझाइनची कॉपी केली, कारण कंपन्यांसमोर अडचण होती की त्याकाळी जिलेट कंपनीचे रेझरची. दुसरे कोणते डिझाईन तयार केले तर ब्लेड त्यामध्ये बसणार नाही, त्यामुळे ब्लेड त्यामध्ये बसायला हवे, त्यासाठी ब्लेड त्याच डिझाइनमध्ये ठेवले जायचे.

दरम्यान, १८९० मध्ये, जिलेट कंपनीचे संस्थापक किंग कॅम्प जिलेट यांनी बाटलीचे झाकण बनवणाऱ्या कंपनीत सेल्समन म्हणून काम केले. कामावर असताना त्यांनी पाहिले की लोक बाटल्यांचे झाकण वापरल्यानंतर फेकून देतात. तरीही एवढी छोटी गोष्ट एवढी मोठी कंपनी बनवत असते.

त्यामुळे जिलेट असेच काहीतरी बनवण्याचा विचार केला, जे लोकांसाठी स्वस्त असेल आणि वापरल्यानंतर फेकून देता येतील. त्या काळी लोक वस्तरा वापरून दाढी करायचे. पण रेझरने दाढी करणे खूप धोकादायक होते तसेच त्यासाठी खूप वेळ लागत होता. त्यामुले किंग कॅम्पने रेझरला पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला आणि दुहेरी धार असलेला सेफ्टी रेझर तयार केला. डिसेंबर १९०१ मध्ये त्यांनी त्याच्या डिझाइनचे पेटंट घेतले.

महत्वाच्या बातम्या-
”मी कडवा शिवसैनिक, ठाकरे कुटुंबाचा निष्ठावंत; शिवसैनिकच काँग्रेसचा आमदार निवडून आणतील”
प्रेमात पडलेल्या युवकालाही भविष्य स्थिर करण्याचा अधिकार; गुन्हा करणाऱ्या तरुणाला न्यायालयाने दिला जामीन
अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या आरोपींवर मोठी कारवाई; बुलडोझरने उद्ध्वस्त केली घरं

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now