Share

आम्हाला ‘जनाब सेना’ मग तुम्हाला ‘हिजबुल सेना’ म्हणायचं का? उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल

udhav thackeray

एमआयएमनं आगामी निवडणुकांसाठी महाविकास आघाडीसोबत हातमिळवणी करण्याची ऑफर दिली आहे. इम्तियाज जलील यांच्या घरी सांत्वन भेटीसाठी गेलेल्या आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यामध्ये चर्चा झाली. यात आपला निरोप पवारांपर्यंत पोहोचवण्याची विनंती जलील यांनी केली होती.

त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. त्याच बरोबर भाजपचे अनेक नेते सातत्याने शिवसेनवर टीका करत, आता सेनेत हिंदुत्व उरलं नाही, असं सांगणायचा प्रयत्न करताना दिसत आहेत. याचबाबत आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

तसेच शिवसेनेने हिंदुत्व सोडलं, असा भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. हिंदू धर्म आम्हीच स्थापन केला, असंही भाजप नेते उद्या म्हणू शकतील. त्यांचं हिंदुत्व हे राजकारणापुरतं आहे, असं ठाकरे यांनी म्हटलं आहे. आम्हाला ‘जनाब सेना’ मग तुम्हाला ‘हिजबुल सेना’ म्हणायचं का, असं ते म्हणाले.

तसेच शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या सर्व खासदारांना आणि जिल्हाप्रमुखांना संबोधित केलं. यावेळी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपावर टीकेची झोड उठवली. भाजपने केलेल्या सर्व टीकांची मुख्यमंत्री ठाकरे यांनी सडेतोड उत्तर दिली.

दरम्यान पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘न बोलावता नवाब शरीफ यांच्या वाढदिवसाचा केक खाण्यासाठी पाकिस्तानात जाणारे आमचे पंतप्रधान. पाकिस्तानात गेल्यानंतर जीनांच्या थडग्यावर नतमस्तक कोण झालं होत. हे सर्व पाहता भाजपला पाकिस्तान जनता पक्ष का म्हणू नये? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

“मेलो तरी MIM शी युती नाही. MIM ही भाजपची B टीम आहे. अफजल गुरुला फाशी देऊ नको म्हणणाऱ्या मेहबुबा मुफ्तींसोबत भाजप सत्तेत सहभागी झाला होता. तितका निर्लज्जपणा शिवसेनेत येणे शक्य नाही. त्यामुळे MIM सोबत आघाडी करण्याचा प्रश्नच असल्याचे पुन्हा एकदा त्यांनी स्पष्ट केले.

महत्त्वाच्या बातम्या
‘औरंगजेबाच्या थडग्यावर डोकी टेकणाऱ्यांसोबत मेलो तरी जाणार नाही’, उद्धव ठाकरेंनी केलं स्पष्ट
पराभवासाठी ‘या’ २ व्यक्ती कारणीभूत, काँग्रेसला घरचा आहेर देत सुशीलकुमार शिंदेंचा गौप्यस्फोट
20 वर्षांपासून बागेत पडला होता पुतळा; आजची किंमत ऐकून जोडप्याला बसला धक्का
भारतात सुरू होत आहे Apple iPhone SE 2022 सेल, बघा किंमत आणि ऑफरचे संपूर्ण डिटेल्स

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now