बॉलिवूड अभिनेत्री किरण खेर या ७० वर्षांच्या झाल्या आहे. १४ जून १९५२ रोजी जन्मलेल्या किरण या अनुपम खेर यांच्या पत्नी आहे. पण त्या कधीच अनुपम खेर यांच्या मुलाची आई होऊ शकल्या नाही. एका मुलाखतीतच त्यांनी याबाबत सांगितलेही होते. (why anupam kher become a father)
किरण खेर यांनी २०१३ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, आम्ही प्रयत्न केला नाही असे नाही. मला सिकंदरला भाऊ-बहिण असावे असे वाटत होते. म्हणून आम्ही प्रयत्न केले. वैद्यकीय सल्लाही घेतला. पण सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले. काहीही उपयोग झाला नाही.
तर अनुपम खेर यांनी २०१३ मध्ये एका मुलाखतीत म्हणाले होते, सिकंदर जेव्हा माझ्याकडे आला तेव्हा तो ४ वर्षांचा होता. तो माझ्यावर खूप प्रेम करतो, माझा आदर करतो आणि तो माझ्यासाठी मित्रासारखा आहे. तो माझ्या मुलासारखाच आहे, त्यामुळे मला माझ्या मुलाची आठवण येत नाही.
किरण खेरचे पहिले लग्न उद्योगपती गौतम बॅरीशी झाले होते, जे फक्त ६ वर्षे टिकले. सिकंदर हा किरण आणि गौतम बॅरीचा एकुलता एक मुलगा आहे. त्यावेळी किरणने गौतमपासून घटस्फोट घेतला आणि अनुपम खेरशी लग्न केले तेव्हा सिकंदर अवघ्या ४ वर्षांचा होता.
तसेच अनुपम खेर यांचेही हे दुसरे लग्न होते. त्यांचे पहिले लग्न १९७९ मध्ये मधुमालती नावाच्या मुलीशी झाले. अनुपमचे हे लग्न त्यांच्या कुटुंबीयांनीच केल्याचे बोलले जात आहे. पण खुद्द अनुपम यावर खूश नव्हते. अनुपम खेर आणि किरण खेर ३७ वर्षांहून अधिक काळ एकत्र आहेत. पण असे असूनही, दोघांनी फक्त एकाच चित्रपटात जोडपे म्हणून काम केले आहे.
किरण आणि अनुपम यांनी २०१४ मध्ये प्रदर्शित झालेला ‘टोटल सियापा’मध्ये जोडपे म्हणून काम केले आहे. विशेष म्हणजे त्यांचे असे फारसे चित्रपट नाहीत ज्यात ते जोडीदार म्हणून दिसले नाही. ‘टोटल सियापा’ व्यतिरिक्त त्यांनी ‘रंग दे बसंती’, ‘वीर जरा’ आणि ‘पेस्टोनजी’मध्येही एकत्र काम केले आहे. पण दोघेही जोडपे म्हणून नव्हते.
महत्वाच्या बातम्या-
बाॅलीवूड पुन्हा काळजीत; ह्रदयविकाराच्या त्रासामुळे चालू शुटींगमधून दिपीका रूग्णालयात दाखल
तृप्ती देसाईंचा महिलांना सल्ला; वटपोर्णिमेला वडाच्या फांद्यांची पूजा करण्यापेक्षा..
..अन् सासूचे निधन झाले तरी मी १५ मिनीटं हसत होते, अर्चना पूरण सिंगच्या वक्तव्याने सगळेच झाले हैराण