सोशल मीडियावरुन जग जवळ आलं आहे, हे खरं असलं तरी कोण कोणाचा आदर्श घेईल हे सांगणं कठिण असतं. सध्या गुंडगिरीची प्रवृत्ती वाढताना दिसून येत आहे. राज्यभरात अनेक तरुण स्वत:ला भाई म्हणून घेत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी धक्कादायक घटनाही घडत आहे. (who is ujjain don durlabh kashyap)
आता अशीच एक घटना औरंगाबादमधून समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या शुभम मनगटेवर तलवारी आणि चाकूने हल्ला झाला. या हल्ल्यात त्याच्यावर तब्बल ५० टाके पडले. शुभमवर झालेल्या या हल्लाचं कारण म्हणजे त्याच्या दुकानावर आलेल्या तरुणांनी त्याला फुकटमध्ये गुटखा मागितला. पण पैसे नाही दिल्यामुळे त्याने गुटखा दिला नाही.
त्यानंतर शुभमला शेजारच्या मैदानात नेण्यात आले आणि तिथे त्याच्यावर तलवारी आणि चाकूने हल्ला करण्यात आला. जिवाच्या आकांताने शुभम ओरडत होता, पण कुणी त्याच्या मदतीला आले नाही. त्यानंतर शेवटी शुभमचे मित्र तिथे आले आणि त्यांनी त्याचा जीव वाचवला.
५ फेब्रुवारीला घडलेल्या या घटनेत पोलिसांनी राजू पठाडे, यश पाखरे, शुभम मोरे, आतिष मोरे, शेख बादशाह, निलेश धस, पिण्या खडके, आणि इतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे तरुण अशाप्रकारे एका तरुणाला मारहाण करेल असा कोणी विचार पण केला नसेल.
या तरुणांपैकी यश पाखरे आणि शेख बादशाह हे दोघे या सदर हल्ल्याच्या दोन दिवस आधीच पोलिस कोठडीतून बाहेर आले होते. २६ जानेवारी रोजी एका लग्नात ते दोघे तलवारी घेऊन नाचत होते. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली होती.
बाहेर आल्यानंतर हे दोघेही आता शुभमच्या दुकानावर गुटखा-सिगारेट ओढण्यासाठी गेले होते. पण त्याने फुकटात देण्यास नकार दिला. दुसऱ्या दिवशीही ते शुभमकडे मागायला गेले आणि त्याने पुन्हा फुकटात देण्यास नकार दिला. त्यामुळे त्याला संपवायचंच या हेतूने त्याच्यावर असा जीवघेणार हल्ला करण्यात आला.
गेल्या काही दिवसांत गुंडगिरीचे प्रमाण खुप वाढले आहे. प्रत्येक भागात तरुणांची एक नवी टोळी तयार होताना दिसत आहे. धक्कादायक म्हणजे सर्वजण स्वत: दुर्लभ कश्यपचे फॉलोवर्स म्हणतात. दुर्लभ कश्यप हा मध्य प्रदेशचा उज्जैनचा डॉन होता. तो वयाच्या २० व्या वर्षीच तिथला मोठा डॉन झाला होता.
किशोरवयात गुंडगिरी करणारा दुर्लभ हा खुलेआम सोशल मीडियावर सुपारी घेण्याच्या जाहिराती द्यायचा. आता ज्या तरुणाने शुभमवर हल्ला केला होता. तो तरुणही स्वत:ला दुर्लभ कश्यपचा फॅन म्हणवून घेतो. तसेच या गँगची तिथल्या नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली असून मुलींना रस्त्यावरुन चालण्याचीही भिती वाटते.
दुर्लभ हा वयाच्या १६ व्या वर्षी गुन्हेगारीच्या क्षेत्रात उतरला होता. तो खुलेआमपणे सुपारी घेण्याची जाहिरात करायचा. कोणाचा जीव घ्यायचा असेल, तर माझ्याशी संपर्क साधा. कपाळावर आडवा गंध, डोळ्यात काजळ, गळ्यात काळा रुमाल असं त्याचं राहणीमान होतं. फेसबूकवर अनेक तरुण त्याच्याशी जोडले गेले होते.
१६ व्या वर्षीच गुंडगिरी करणाऱ्या आणि गुन्हेगारी करुन मोठे फॉलोवर्स मिळवणाऱ्या दुर्लभचा वयाच्या २० व्या वर्षी अंत झाला. ६ सप्टेंबर २०२० मध्ये त्याचा एका गँगवॉरमध्ये मृत्यु झाला. कश्यपची एवढी भयानक हत्या होऊनही अनेकजण त्याच वाईट मार्गावर जाताना दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या-
हिजाब वाद: कॉलेजच्या बाहेर ‘अल्ला हु अकबर’च्या घोषणा का दिल्या? मुस्कानने केला खुलासा
शिवाजी पार्कमध्ये लतादिदींचे स्मारक करण्याबाबत ह्रदयनाथ मंगेशकरांनी दिली प्रतिक्रीया, म्हणाले कृपया..
PHOTO: 65 वर्षीय अनिल कपूरच्या धाकड बॉडीसमोर पाणी कम चाय आहेत गबरू जवान; वय फक्त आकडे