Share

महाराष्ट्रातल्या राजकारणातील चाणक्य कोण? शरद पवार की देवेंद्र फडणवीस? कोणाचा डाव यशस्वी होणार?

महाराष्ट्राच्या राजकारणाचा वाद आता शिगेला पोहचला आहे. हा शिवसेनेचा अंतर्गत विषय आता राहिला नाही. बंडखोर आमदारांनी थेट सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. या संघर्षात शिवसेनेचे उद्धव ठाकरे विरुद्ध शिवसेना बंडखोर नेते एकनाथ शिंदे असं चित्र समोर दिसत असलं तरी याची दुसरी बाजू पण आहे.शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील छुपा वाद पण यामागे आहे. (Who is the Chanakya in Maharashtra politics? Sharad Pawar or Devendra Fadnavis?)

२०१९ला मी पुन्हा येईल, असं बोलणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना शरद पवारांच्या प्रयत्नातून तयार झालेल्या महाविकास आघाडी सरकारमुळे विरोधी बाकावर बसावे लागले. भाजप, शिवसेनेत सरकार स्थापनेवरून वाद झाले. त्यानंतर शरद पवारांनी प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या चाणक्यनीतीने काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना अशा भिन्न विचारसरणी असणाऱ्या पक्षांना एकत्र आणले. हाच पवारांचा देंवेंद्र फडणवीसांना पहिला धक्का होता.

देवेंद्र फडणवीसांनी भाजपकडून मुख्यमंत्रीपद ५ वर्ष उपभोगले. पक्षातील विरोधकांना त्यांनी एक एक करत स्पर्धेतून बाहेर काढले. केंद्रातील सरकारच्या मदतीने विरोधकांवर चौकशीचा फास आवळत त्यांना गप्प केले. मात्र शरद पवारांना हलक्यात घेतल्यामुळे सर्वाधिक संख्याबळ असून २०१९ ला फडणविसांना सत्तेत येता आले नाही. तिथून त्यांचा खरा छुपा वाद सुरु होतो.

त्यानंतर फडणवीस गप्प बसले नाहीत. विरोधी बाकावरून सरकारची कोंडी करण्याची एकही संधी त्यांनी सोडली नाही. त्यांनी मागील काही दिवसांत राज्यसभा, विधानपरिषदेच्या निवडणुकांमध्ये मतांची जुळवाजुळव करत भाजपला दणक्यात विजय मिळवून दिला. आता शिंदे गटाच्या नाराजीचा फायदा घेत त्यांनी या गटाला पाठींबाच दिल्याचे समजते. दुसरीकडे माविआ सरकार वाचवण्याचा शरद पवार यांचा प्रयत्न आहे.

गुवाहाटीत तळ ठोकून असलेल्या आमदारांना संबोधित करताना, ‘एका राष्ट्रीय पक्ष आपल्या पाठीशी आहे’, असे एकनाथ शिंदे बोलले होते. हॉटेलमधल्या या व्हिडीओमुळे हे तर स्पष्ट होते की, भाजपने या वादात एंट्री केली आहे. वडोदरा येथे फडणवीस यांची बंडखोर नेत्यांसमवेत चर्चा झाल्याचे समजते. फडणवीसांच्या सहकार्याने दिल्लीतून ही सूत्रे हालत असल्याचे अटकाव बांधले जात आहेत.

शरद पवारांना राजकारणाचे चाणक्य म्हंटले जाते. सर्वात कमी वयात(३८) ते राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत. तब्बल ४ वेळा या पदावर त्यांनी काम पाहिले. २०१९ला पवारांनी ‘माविआ’ सरकार आणत, आपली राजकीय पॉवर फडणवीसांना दाखवून दिली. आता मात्र पवारांच्या माविआ सरकारमध्ये फूट पडणाऱ्या बंडखोर आमदारांना सोबत घेत भाजपचे सरकार फडणवीसांनी आणले तर आता देवेंद्र फडणवीस राजकीय चाणक्य ठरतील की काय? हे येणारा काळच ठरवेल.

महत्वाच्या बातम्या-
शिवसेना नेते संजय राऊतांनी दिले मनोहर जोशींचे घर जाळण्याचे आदेश
गुप्तधनाच्या लालसेपोटी मांत्रिकाला दिले 1 कोटी, त्याने पुर्ण कुटुंबच संपवलं, 9 जणांच्या हत्येचा उलगडा
तब्बल सहा दिवसांनी पहिल्यांदाच मीडियासमोर बोलले एकनाथ शिंदे; उद्धव ठाकरेंना दिले ‘हे’ चॅलेंज

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now