महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त मुंबईत एक भाषण दिले होते. या भाषणात त्यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेतली होती. राज ठाकरेंच्या या भाषणानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली होती. (who is saleem shaikh)
राज ठाकरेंच्या त्या भाषणानंतर त्यांच्यावर अनेक राजकीय नेत्यांनी टीका केल्या होत्या. तसेच मनसेतील मुस्लिम नेतेही नाराज झाले होते. तसेच काही मुस्लिम नेत्यांनी तर पदाचा राजीनामा देखील दिला होता. पण काही मुस्लिम नेत्यांनी त्यांना पाठिंबाही दिला होता. त्यातलेच एक नगरसेवकर म्हणजे सलीम मामा शेख.
उत्तर सभेच्या भाषणावेळी मनसे नेते सलीम मामा शेख हे देखील चर्चेत आले आहे. त्यांनीही ठाण्यातील सभेत आपलं मत मांडलं आहे. यावेळी सलीम शेख यांनी धक्कादायक खुलासेही केले आहे. राज ठाकरेंच्या भाषणानंतर माझा डीएनए चेक करण्यात आला, असे सलीम मामा म्हणाले आहे.
राज ठाकरेंच्या भाषणानंतर मला वेगवेगळ्या प्रकारे त्रास देण्यात आला होता. इतकंच नाही, तर माझा डीएनए सुद्धा चेक करण्यात आला. मी आता सांगतो की, माझा डीएनए मोहम्मद पैगंबरांचा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आहे, असे सलीम शेख यांनी म्हटले आहे.
तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जेव्हा नाशिक महापालिकेत सत्ता होती. तेव्हा मला राज ठाकरेंनी संधी दिली. त्यावेळी राज साहेबांनी माझी जात न बघता, मला नाशिक महापालिकेमध्ये सभागृह नेता केलं. त्यानंतर नाशिकच्या स्थायिक समितीचा सभापतीही केलं. माझा नेता कधीही मुस्लिमांच्या विरोधात नव्हता आणि असणारही नाही, असेही सलीम शेख यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राज ठाकरेंनी उत्तर सभेत बोलताना, आपण भोंग्यांबाबतच्या भूमिकेवर ठाम असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. येत्या ३ मे रोजी रमजान ईद आहे. माझी राज्य सरकार आणि गृह खात्याला विनंती आहे. आम्हाला कुठलीही दंगल, तेढ निर्माण करायचा नाही. महाराष्ट्राचं स्वास्थ बिघडवायचं नाही. ३ मेपर्यंत सर्व मशिदींवरील भोंगे उतरवायला सांगा. तसेच आमच्याकडून तीन तारखेनंतर तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही, असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
नागानं फणा काढावा असा चेहरा आहे म्हणणाऱ्या राज ठाकरेंना आव्हाडांचं प्रत्युत्तर; म्हणाले…
“वारसा प्रबोधनकारांचा पण विचारसरणी मात्र नथुराम गोडसेची” जयंत पाटलांचं राज ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर
मंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा झटका, मुंबईतील ब्रिच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल