Share

टीम इंडियाचा स्टार खेळाडू करणार लग्न, जाणून घ्या कोण आहे त्याची ‘ही’ धाकड गर्ल?

टीम इंडियाचा लेगस्पिनर राहुल चाहर ९ मार्चला लग्नबंधनात अडकणार आहे. राहुल त्याची गर्लफ्रेंड ईशानीसोबत गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग करणार आहे. ईशानी व्यवसायाने फॅशन डिझायनर आहे. या दोघांनी २०१९ मध्ये जयपूरमध्ये एंगेजमेंट केली होती. (who is rahul chahar wife)

गोव्यातील लग्नानंतर आग्रा येथेही रिसेप्शन देण्यात येणार आहे. हे दोघे खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. या लग्नात राहुलचा भाऊ दीपक चाहर आणि बहीण मालती चहर देखील सहभागी होणार आहेत.लग्नासाठी राहुलचे कुटुंबीय गोव्यात पोहोचले आहेत, तर दीपक लग्नाच्या दिवशी गोव्यात पोहोचणार आहेत.

त्याची बहीण मालती चहरही या लग्नात सहभागी होणार आहे. राहुल आत्तापर्यंत मुंबई इंडियन्सकडून खेळत होता, मात्र यावेळी किंग्स इलेव्हन पंजाब या संघाने त्याला आपल्यात घेतले आहे. राहुलने भारताकडून एकदिवसीय आणि टी-२० सामनेही खेळले आहेत.

IPL मेगा लिलाव २०२२ मध्ये राहुलला ५.२५ कोटी इतकी मोठी किंमत मिळाली आहे. आयपीएलमध्ये तो प्रथमच मुंबई सोडून दुसऱ्या संघाकडून खेळणार आहे. २०१८ ते २०२१ पर्यंत राहुल मुंबई संघाचा भाग होता. राहुल चहरने भारतासाठी एक वनडे आणि पाच टी-२० सामने खेळले आहेत.

एका एकदिवसीय सामन्यात त्याने तीन विकेट्स घेतल्या आहेत, तर पाच टी-२० सामन्यात त्याने सात विकेट्स घेतल्या आहेत. या काळात त्याचा इकॉनोमी रेट ७.५९ राहिला आहे. दरम्यान, त्याने आयपीएलमध्ये ४२ सामन्यांमध्ये ४३ विकेट घेतल्या आहेत.

त्याच्या इकॉनॉमीमुळे तो टी-20 मध्ये खूप उपयुक्त गोलंदाज मानला जातो.राहुल चहरशिवाय दीपकही व्यस्त आहे. स्टेडियममध्येच आयपीएल सामन्यादरम्यान त्याने त्याची गर्लफ्रेंड जया भारद्वाजला प्रपोज केले होते. दीपकही लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.

महत्वाच्या बातम्या-
पेट्रोल-डिझेलचा उडणार भडका, भाव जाणार 200 रुपयांच्या पार, रशियाचा इशारा, निर्माण होईल टंचाई
सोपं नव्हतं अनुपम खेर बननं; अभिनयासाठी केली चोरी, आईचा मार खाल्ला, अनेक रात्री काढल्या उपाशी
देवदूत! भर युद्धात 2424 किमी बाईक चालवत पोहोचला आणि लोकांपर्यंत पोहोचवल्या आवश्यक वस्तू, औषधे

खेळ ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now