Share

काली माँला सिगरेट ओढताना दाखवणारी मणिमेकलाई कोण आहे? यापुर्वीही बनवले होते वादग्रस्त चित्रपट

भारतात, जिथे पैगम्बर मुहम्मद यांच्या कथित अपमानासाठी सार्वजनिकरित्या लोकांची चिरफाड केली जात आहे, तर दुसरीकडे हिंदू देवी-देवतांचा अपमान सुरू आहे. अलीकडेच चित्रपट निर्मात्या लीना मनिमेकलाई यांनी ‘काली’ नावाचा एक माहितीपट बनवला आहे, ज्यामध्ये मां काली सिगारेट ओढताना दाखवण्यात आली आहे. लीनाच्या या चित्रपटाबद्दल हिंदूंमध्ये रोष आहे.

लीना मनिमेकलाईने नुकतेच कॅनडामध्ये तिच्या माहितीपटाचे प्रमोशन केले. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये देवी कालीच्या रूपातील एक अभिनेत्री सिगारेट ओढताना दिसत आहे. त्याचवेळी त्याच्या दुसऱ्या हातात एलजीबीटी समुदायाचा ध्वज दिसतो. लीना मनिमेकलाई यांनी हे करून हिंदूंच्या भावनांशी खेळ केला आहे.

लीनाच्या या कृतीवर लोक तिलाच नाही तर आशा पोनाचन या चित्रपटाच्या निर्मात्यालाही फटकारत आहेत. लीना मणिमेकलाई या चित्रपट निर्मात्या, कवयित्री आणि अभिनेत्री आहेत. त्यांचे ५ काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. याशिवाय तिने डॉक्युमेंटरी आणि प्रायोगिक कविता चित्रपटही केले आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये त्यांना पुरस्कारही मिळाले आहेत.

लीनाने २००२ मध्ये ‘मथम्मा’ या लघुपटाद्वारे तिच्या करिअरची सुरुवात केली होती. २० मिनिटांचा डॉक्युमेंटरी चेन्नईजवळील अरक्कोनमच्या मंगट्टाचेरी गावात अरुंधतीयार समुदायामध्ये प्रचलित असलेल्या प्रथेबद्दल आहे, ज्यामध्ये मुलींना त्यांच्या देवतेला अर्पण केले जाते. लीना मणिमेकलाई यांचा पहिला फिचर फिल्म सेंगदाल हा २०११ मध्ये बनला होता.

श्रीलंकेतील वांशिक युद्धामुळे धनुषकोडीतील मच्छिमारांच्या जीवनावर कसा परिणाम झाला हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. सेन्सॉर बोर्डाने सुरुवातीला या चित्रपटाला प्रमाणपत्र देण्यास नकार दिला होता की या चित्रपटात श्रीलंका आणि भारत सरकारबद्दल अपमानास्पद आणि राजकीय टिप्पणी करण्यासोबत असंसदीय शब्दांचा वापर करण्यात आला आहे. बऱ्याच कायदेशीर लढाईनंतर हा चित्रपट जुलै २०११ मध्ये प्रदर्शित झाला.

महत्वाच्या बातम्या-
कालीन भैयाच्या सुनेनं बिकीनी घालून पाण्यात लावली आग, फोटो पाहून तुमचेही उडतील होश
मिर्झापुर ३ चे शूटिंग सुरू होण्याच्या आधीच कालीन भैयाने सांगून टाकली संपूर्ण कहाणी, अनेक प्रश्नांची मिळाली उत्तरे
बापरे! सातवी पास युवकाने ३० हजारात बनवली ब्रिटिशकालीन फोर्ड गाडी..
कालीचरणसोबतचा ‘तो’ फोटो व्हायरल केल्याने नेटकऱ्यांवर संतापल्या रुपाली ठोंबरे, म्हणाल्या

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now