Share

रशियाला नमवण्यासाठी बायडन यांनी सोपवली भारतीयावर जबाबदारी; जाणून घ्या कोण आहे दलीप सिंग?

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनच्या डोनेस्तक आणि लुहान्स्क या दोन शहरांना स्वतंत्र प्रदेश म्हणून घोषित केले आहे. तसेच त्यानंतर तेथे सैन्य पाठवल्याने युद्धाची भीती वाढली आहे. रशियाला वेढा घालण्याच्या आणि राजनैतिक तोडग्यासाठी चर्चा करण्याच्या उद्देशाने अमेरिका त्यांच्यावर कठोर निर्बंध लादत आहे. (who is daleep singh)

भारतीय-अमेरिकन आर्थिक सल्लागार दलीप सिंग हे या महत्त्वाच्या कामात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना मदत करत आहेत. पुतीन यांच्या चालीमुळे रशिया आणि युक्रेन आणि पाश्चात्य देशांमधील युद्धाचा धोका वाढला आहे. रशिया युक्रेनवर हल्ला करेल अशी भीती पाश्चिमात्य देशांना आहे. रशियानेही पूर्व युक्रेनमध्ये सैन्य पाठवण्याचे आदेश दिले आहेत. पण क्रेमलिनने या कारवाईला ‘शांतता अभियान’ असे म्हटले आहे.

भारतीय-अमेरिकन नागरिक दलीप सिंग हे अमेरिकेचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. ते बायडन प्रशासनाला आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेबाबत सल्ला देतात. यासोबतच ते अमेरिकेच्या नॅशनल इकॉनॉमिक कौन्सिलचे डेप्युटी डायरेक्टर देखील आहेत. युक्रेन आणि रशियामधील तणावाच्या पार्श्वभूमीवर अलीकडच्या काही दिवसांत ते दुसऱ्यांदा व्हाईट हाऊसमध्ये दिसले आहे.

दलीप सिंग हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या जवळचे मानले जातात. युक्रेन संकटावर रशियावर निर्बंध लादण्याचा विचार करताना, बायडन प्रशासनाने सर्वप्रथम दलीप सिंग यांना व्हाईट हाऊसमध्ये बोलावले. व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या जेन साकी यांनी दलीप सिंग यांच्याबद्दल सांगितले की, सिंग हे खुप महत्वाचे आहे, त्यामुळेच त्यांना बोलावण्यात आले.

दरम्यान, युक्रेनविरुद्ध रशियाची कारवाई सुरू झाली आहे, त्यामुळे आमच्या प्रतिसादालाही वेग आला आहे. आमचा वेग आणि आमचा समन्वय ऐतिहासिक आहे. आम्ही रशियाचा महत्त्वाचा नॉर्ड स्ट्रीम-२ नैसर्गिक वायू प्रकल्पही जर्मनीकडून रातोरात बंद केला. असे निर्बंध लादण्यासाठी सहसा आठवडे आणि महिने लागतात, परंतु दलीप सिंग यांच्या नेतृत्वाखाली बायडन प्रशासनाने त्वरीत कारवाई केली, असे जेन साकी म्हणाल्या आहे.

यावर बोलताना दलीप सिंग म्हणाले की, रशियाने जर्मनीला गॅस पुरवठा करण्यासाठी नॉर्ड-२ प्रकल्पात ११ डॉलर अब्जांची मोठी गुंतवणूक केली आहे. आता ही गुंतवणूक वाया गेली आहे. हा प्रकल्प रशियाला पैसे भरून काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार होता. हा केवळ रशियाला आर्थिक फटका नाही, तर प्रकल्प बंद झाल्यानंतर युरोपला गॅससाठी त्यावर अवलंबून होता.

दलीप सिंह म्हणाले की, आम्ही आमच्या आर्थिक निर्बंधातून ताकद दाखवली आहे. हे करून आम्ही काहीही चुकीचे केलेले नाही. आमच्या मित्र राष्ट्रांसोबत आम्ही रशियाला जागतिक आर्थिक व्यवस्थेपासून वेगळे करण्याचा प्रयत्न केला आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यास रशियाच्या दोन मोठ्या वित्तीय संस्थांवरही बंदी घालण्यात येईल. त्यांच्याकडे ७५० अब्ज डॉलर्सची प्रचंड संपत्ती आहे.

महत्वाच्या बातम्या-
जागरण गोंधळात हलगी वाजवणारा बाळू तृतीयपंथी सपनावर झाला फिदा, आता दोघेही करणार लग्न
तरुणांमध्ये प्रसिद्ध असलेल्या RJ चे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, चाहत्यांना बसला जबर धक्का
मनी लाँड्रिंग प्रकरणात नवाब मलिकांना न्यायालयाने सुनावली ‘इतक्या’ दिवसांची कोठडी; राष्ट्रवादीला मोठा धक्का

आंतरराष्ट्रीय

Join WhatsApp

Join Now