Share

कोण आहे दादूस शेठ म्हणून प्रसिध्द झालेला ‘हा’ तरुण; वाचा खरी कहाणी..

आज आपण एका अशा व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत. ज्याने खुप कमी वेळात कॉमेडीच्या जगात धुमाकूळ घातला आहे. या व्यक्तीला अनेक जण दादूस म्हणतात. तर काही जण दादूस शेठ (dadus sheth). या व्यक्तीचे नाव आहे विनायक माळी. (who is dadus sheth famous in all over maharashtra)

विनायकने (vinayak mali) खुप कमी वेळात मनोरंजन क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. विनायकला अग्री कॉमेडी किंग बोलले जाते. त्याला युट्युबवरील कॉमेडीचा बादशहा बोलले तर त्यात काही चुकीचे नाही. जाणून घेऊया विनायक माळी कसा झाला कॉमेडी किंग.

विनायक माळी हे नाव सध्या सोशल मीडियावर खुप जास्त गाजत आहे. याचे कारण म्हणजे त्याचे लोकांना हसवणारे विनोदी व्हिडिओ. विनायकची लोकप्रियता खुप जास्त आहे. त्याचे लाखो चाहते आहेत. दिवसेंदिवस त्याची प्रसिद्धी वाढत आहे.

विनायकची प्रसिद्धी एवढी जास्त आहे की, अनेक मोठे कलाकार त्यांच्या चित्रपटाचे प्रोमोशन करण्यासाठी विनायकची मदत घेतात. त्यासोबतच त्याला अनेक कॉमेडी चित्रपटांच्या ऑफर देखील आल्या आहेत.

विनायक माळीचा जन्म २२ सप्टेंबर १९९५ ला रायगड जिल्ह्यातील पनवेल इथे झाला. तो एका मध्यम वर्गीय अग्री कुटुंबात जन्मला. त्याचे वडील सरकारी कर्मचारी आहेत. त्याचे सगळे बालपण ठाण्यात गेले. त्याचे शिक्षण देखील ठाण्यातच झाले आहे.

शिक्षण पुर्ण झाल्यानंतर विनायकने काही काळ नोकरी देखील केली आहे. विनायकने विप्रोसारख्या मोठ्या कंपनीत काम केले आहे. पण इथे काम करत असताना विनायकला आरोग्यावर परिणाम होत होता. म्हणून त्याने ही नोकरी सोडली.

नोकरी सोडल्यानंतर विनायकने एलएलबीचे शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. याच कालावधीत विनायकने युट्यूबवर चॅनल बनवून व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. सुरुवातीला त्याने हिंदीमधून व्हिडिओ बनवायला सुरुवात केली.

विनायक स्वतः च्या त्याच्या व्हिडिओची स्क्रिप्ट लिहितो. त्यासोबतच तो दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून देखील स्वतः काम करतो. विशेष म्हणजे विनायकचे सगळे व्हिडिओ अग्री कोळी भाषेतून असतात. म्हणून त्याचा अभिनय खुप नैसर्गिक वाटतो. हळूहळू विनायकच्या व्हिडिओची प्रसिद्धी वाढत होती.

म्हणून विनायकने त्याच्या व्हिडिओमध्ये अनेक बदल केले. सुरुवातीला तो एकटा अभिनय करत होता. त्यानंतर त्याने त्याच्या मित्रांसोबत आणि कुटुंबासोबत व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. माझी बायको, दादूस सीरिज, दादूस निघाला गोव्याला अशा अनेक प्रकारच्या व्हिडिओ त्याने बनवल्या.

विनायकच्या या व्हिडिओ लोकांनी तुफान प्रतिसाद दिला. त्याचे व्हिडिओ खुप मोठ्या प्रमाणावर हिट झाले. लाखो करोडो लोकांनी त्याचे व्हिडिओ बघितले. आज तो अग्री कॉमेडी किंग म्हणून प्रसिद्ध आहे. त्याची लोकप्रियता खुप जास्त आहे. त्याला करोडो चाहते आहेत.

महत्वाच्या बातम्या
उज्जैनच्या गुंडाचे औरंगाबादमध्ये चाहते, कोण होता कपाळाला आडवा गंध आणि डोळ्यात काजळ घालणारा दुर्लभ?
हिजाब वाद: कॉलेजच्या बाहेर ‘अल्ला हु अकबर’च्या घोषणा का दिल्या? मुस्कानने केला खुलासा
रश्मिकाने ‘या’ बॉलिवूड स्टार्ससोबत काम करण्यास दिला होता साफ नकार, नावं वाचून अवाक व्हाल
बॉसने कर्मचाऱ्याला गिफ्ट केली नवीकोरी मर्सिडीज बेंझ, कारण वाचून तुम्हालाही वाटेल कौतुक

मनोरंजन

Join WhatsApp

Join Now