who is child actor khushi hajare | प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया यांचा वेड हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. मराठी भाषिक असलेला हा चित्रपट सुपरहिट ठरताना दिसून येत आहे. कित्येक वर्षानंतर जेनेलिया आणि रितेश एकत्र काम करताना दिसून येत आहे.
रितेश आणि जेनेलिया सोडून अनेक प्रसिद्ध कलाकारही आहे. रवी जाधव, जितेंद्र जोशी, अशोक सराफ, सचिन पिळगावकर, अशुतोष गोवारीकर, फराह खान, सोनाली बेंद्रे, विशाल चोप्रा असे बरेच कलाकार या चित्रपटात आहे. पण आता एक बालकलाकार चर्चेत आली आहे.
त्या बालकलाकारने देखील सगळ्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. त्या लहान अभिनेत्रीने आपल्या अभिनयातून सर्व प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळी छाप सोडली आहे. त्यामुळे तिचे चांगलेच कौतूक होत असून तिचा चाहता वर्गही वाढताना दिसून येत आहे.
चित्रपटात असणाऱ्या चिमुकलीचे नाव खुशी हजारे असं आहे. तिने वेड चित्रपटात मीरा नावाच्या मुलीची भूमिका साकारली आहे. तिने अनेक हिंदी, मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने आतापर्यंत वजनदार, प्रवास, आपडी थापडी, भूत या चित्रपटांमध्ये काम केले आहे. २०२० मध्ये तिने बालकलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती.
खुशीने अनेक प्रसिद्ध कलाकारांसोबत काम केले आहे. त्यामध्ये ऐश्वर्या रॉय, जानव्ही कपूर, श्रेयस तळपदे, अशोक सराफ, पद्मिनी कोल्हापूरे, सई ताम्हणकर यांसारख्या कलाकारांच्या नावांचा समावेश आहे. खुशीच्या आईचे नाव गीतांजली हजारे असून त्या एक डॉक्टर आहे.
दरम्यान, वेड चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत आहे. वेडला लोकांचा इतका तुफान प्रतिसाद मिळत आहे की, अवतार २ आणि सर्कसचे शो बंद करावे लागत आहे. फक्त सहाच दिवसांत या चित्रपटाने १५ कोटींचा गल्ला जमावला आहे.
महत्वाच्या बातम्या-
ved : रितेश-जेनेलियाच्या ‘वेड’ने लावले लोकांना ‘वेड’, ६ दिवसांत जमावला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला
ratan tata : कर्मचाऱ्याचा जीव वाचवण्यासाठी रतन टाटांनी जे केलं ते कोणताच उद्योगपती करणार नाही
Ranji trophy : ना कोहलीने विश्वास दाखवला ना रोहितने संधी दिली, पुण्याच्या खेळाडूने धडाकेबाज द्विशतक झळकावत दिले सडेतोड उत्तर