ved 6 days box office collection | रितेश देशमुख आणि जेनेलिया यांच्या वेड या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. दोघेही खुप वर्षानंतर एकत्र झळकले आहे. -वेड चित्रपटातील रितेश आणि जेनेलियाचा लुक भारावून टाकणारा आहे. याआधीही लोकांनी पडद्यावर त्यांच्या जोडीला पसंत केले होते.
आता दोघे पुन्हा वेड या चित्रपटातून चर्चेत आले आहे. ३० डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. कित्येक दिवसांपासून या चित्रपटाची प्रेक्षक वाट पाहत होते. पण अखेर हा चित्रपट प्रदर्शित झाला . या चित्रपटाला अजय-अतुल यांनी संगीत दिले आहे.
तसेच चित्रपटात रितेश आणि जेनेलिया सोडून अनेक प्रसिद्ध कलाकारही आहे. रवी जाधव, जितेंद्र जोशी, अशोक सराफ, सचिन पिळगावकर, अशुतोष गोवारीकर, फराह खान, सोनाली बेंद्रे, विशाल चोप्रा असे बरेच कलाकार या चित्रपटात आहे. या चित्रपटाला मराठी प्रेक्षकांकडून खुप चांगला प्रतिसाद मिळत आहे.
थिएटरबाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड लागत आहे. लोकांचा वेडला इतका चांगला प्रतिसाद मिळाला आहे, थिएटर मालकांनी थेट हॉलिवूडच्या अवतार २ चे शो बंद केले आहे. दोन आठवड्यांपूर्वी रोहित शेट्टीचा सर्कस आणि अवतार २ हे चित्रपट प्रदर्शित झाले होते. त्यावेळी प्रेक्षक सर्कसला सोडून अवतारला गर्दी करत होते.
अवतार चित्रपटाची जादू यावेळीही पाहायला मिळत होती. पण वेड चित्रपटाचा वाढता प्रतिसाद पाहता अवतार आणि सर्कसचे शो बंद करुन वेड चित्रपटाचे शो लावण्यात आले आहे. त्यामुळे मराठी प्रेक्षकांनाही आता वेड चित्रपट पाहणं सोपं झालं आहे. इस्लामपूरच्या शिवपार्वती थिएटरमध्ये असे घडले आहे.
वेड हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत आहे. वेडने फक्त सहा दिवसांत तब्बल १५ कोटी ६७ लाख रुपये कमावले आहे. गेल्या काही महिन्यांपासून मराठी चित्रपटांना प्राईम टाईममध्ये स्क्रीन मिळत नसल्याच्या तक्रारी येत होत्या. पण रितेश-जेनेलियाच्या चित्रपटामुळे काही थिएटर मालकांना थेट बॉलिवूड आणि हॉलिवूड चित्रपटांचेच शो बंद करावे लागले आहे.
महत्वाच्या बातम्या-
ratan tata : कर्मचाऱ्याचा जीव वाचवण्यासाठी रतन टाटांनी जे केलं ते कोणताच उद्योगपती करणार नाही
amit shaha : ‘ते’ पोस्टर पाहिलं अन् अमित शहांनी ठरवलं की शिवसेनेला धडा शिकवायचा; वाचा सत्तांतराची इनसाईड स्टोरी
raj thackeray : आता जैन धर्मियांसाठी राज ठाकरे मैदानात! सरकारकडे केली ‘ही’ मोठी मागणी