Share

अर्ध्या तासात १० लाख गोळा करून सेल्समनची जिरवणारा तो शेतकरी कशाची शेती करतो?

Don’t judge a book by its cover ही इंग्रजी म्हण तुम्ही ऐकली असेलच. कर्नाटकातील तुमकूरमध्ये एका कार सेल्समनने शोरूममध्ये शेतकऱ्याचा अपमान केला आणि त्यानंतर जे घडले ते पुर्ण देशाने पाहिले. पण एखाद्याला कमी लेखणे मूर्खपणाचे असल्याचे शेतकऱ्याने सिद्ध करून दाखवले. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

घटना अशी आहे की, चिक्कसांद्र हुबळी येथील रमणपल्या येथील केम्पेगौडा नावाचा शेतकरी आपल्या मित्रांसह तुमकूर येथील महिंद्रा कंपनीच्या शोरूममध्ये कार खरेदी करण्यासाठी पोहोचला. पण एका सेल्समनने त्याचे कपडे पाहिले आणि त्याची खिल्ली उडवली. सेल्समन म्हणाला, ’10 लाख रुपये दूर, तुझ्या खिशात 10 रुपयेही नसतील’.

यानंतर शोरूममधून बाहेर पडण्यापूर्वी शेतकरी आणि त्याच्या मित्रांनी अर्ध्या तासात रोख रक्कम आणली तर आज डिलिव्हरी होईल का? असे विचारले. शोरूमधील कर्मचाऱ्यांनी त्यास सहमती दर्शवली आणि शेतकऱ्याने 30 मिनिटांत 10 लाख रुपये गोळा केले आणि शोरूममधील सगळ्यांनाच थक्क केले. दहा लाख रुपये रोख देऊन त्यांची ड्रीम कार खरेदी करण्यासाठी तो परतला.

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की केम्पेगौडा सुपारीची शेती करतात. पण ते जास्मिन आणि क्रॉसेंड्राचीही लागवड करतात. तुमच्या माहितीसाठी जगात सुपारीचे सर्वात जास्त उत्पादन भारतात होते. एवढेच नाही तर त्याचा खपही भारतात सर्वाधिक आहे. भारतातील सुपारी उत्पादनात कर्नाटकचा वाटा ४० टक्क्यांहून अधिक आहे.

यानंतर केरळचा वाटा 25 टक्के, आसामचा 20 टक्के आहे. त्यानंतर तामिळनाडू, मेघालय आणि पश्चिम बंगालचा क्रमांक लागतो. दरम्यान, शुक्रवारी घडलेल्या घटनेनंतर त्याच दिवशी कारची डिलिव्हरी होऊ शकली नाही. शनिवार व रविवार सरकारी सुटी असल्याने कर्मचाऱ्यांनी त्यादिवशीही डिलीव्हरी केली नाही. यामुळे केम्पेगौडा आणि त्यांचे मित्र नाराज झाले.

तक्रार देण्यासाठी त्यांनी पोलिसांना बोलावले. शेतकऱ्यांनी शोरूमला घेराव घातला आणि ते बाहेर पडायला तयार नव्हते. पोलिसांनी त्यांना समजावले आणि घरी जाण्यास सांगितले. केम्पेगौडा म्हणाले, ‘माझा आणि माझ्या मित्रांचा अपमान केल्याबद्दल मी सेल्स एक्झिक्युटिव्ह आणि शोरूमच्या अधिकाऱ्यांना लेखी माफी मागण्यास सांगितले आहे. आता मला कार नको आहे, असे ते म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या
व्वा रे पठ्ठ्या! ना घोडा, ना कार थेट JCB वरून नवरदेव घेऊन आला वरात; वाचा लग्नाची भन्नाट गोष्ट
यापुढे सातबारा उतारा होणार बंद; भूमी अभिलेख विभागाने घेतला मोठा निर्णय
लहान मुलांना मदत न केल्यानं नॅशनल क्रश रश्मिका ट्रोल; लोकं म्हणाली एवढे पैसे कमावून काय उपयोग
कार्तिक आर्यनच्या धमकीमुळे रिलीज होऊ शकला नाही ‘अला वैकुंठपुरमलो’चा हिंदी व्हर्जन? निर्मात्याचा खळबळजनक खुलासा

इतर

Join WhatsApp

Join Now