Share

BJP : विधानसभेत तिसऱ्यांचा विजय, आप-काँग्रेसच्या उमेदवारांना धुळ चारणाऱ्या संगीता पाटील आहेत तरी कोण?

sangeeta patil

who is bjp mla sangeeta patil | नुकताच गुजरात विधानसभा निवडणूकीचा निकाल लागला आहे. या विधानसभा निवडणूकीत भाजपने १५६ जागांवर विजय मिळवत बहूमत मिळवले आहे. अशात एक महिला आमदार चांगलीच चर्चेत आली आहे. तिने तिसऱ्यांदा आपल्या मतदार संघात विजय मिळवला आहे.

विशेष म्हणजे ती महिला आमदार ही मराठी आहे. संगीता पाटील असे महिला आमदाराचे नाव आहे. त्या गुजरातमधील लिंबायत मतदार संघातून तिसऱ्यांदा विजयी झाल्या आहे. संगीता पाटील या भाजपच्या विश्वासू नेत्यांपैकी एक आहे. त्यांनी लिंबायत या मराठी बहुल मतदार संघात तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे.

लिंबायत मतदार संघात मराठी लोकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे संगीता पाटील यांना मिळणारा प्रतिसादही मोठ्या प्रमाणात आहे. सी आर पाटील हे भाजपचे खासदास सुद्धा मराठी नेते आहे. त्यांना सुद्धा गुजरातमधील मराठी लोकांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असतो.

या निवडणूकीत संगीता पाटील यांना ९५ हजार मतं मिळाली आहे. तर विरोधी उमेदवार काँग्रेस नेते गोपाळ डी पाटील यांना २९ हजार मतं मिळाली. तर आपचे उमेदवार पंकजभाई तायडे यांना ३७ हजार मतं मिळाली आहे. या तीन मराठी उमेदवारांच्या लढतीत संगीता पाटील यांना तिसऱ्यांदा विजय मिळवता आला आहे.

महाराष्ट्रात खानदेशातील मराठी लोकांची संख्या या मतदार संघात जास्त आहे. या मतदार संघात ८० हजार मतदार मराठी आहे. ७६ हजार मुसलमान आहे. ३८ हजार गुजराथी, तर २१ हजार उत्तर भारतीय आहे. तसेच ११ हजार राजस्थानी आणि १२ हजार नागरिक तेलुगू आहे.

संगीता पाटील यांना या मतदार संघातील समस्या माहिती आहे. या मतदार संघात पिण्याच्या पाण्याची आणि शुद्ध पाण्याची समस्या आहे. त्यामुळे त्या मुद्यांवरच संगीता पाटील यांनी ही निवडणूक जिंकल्याची चर्चा आहे. आता त्यांचा पाणी प्रश्न सुटण्यासाठी नागरिक वेगवेगळ्या मागण्या करताना दिसून येण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या-
ruturaj gaikwad : आई-बाबांमुळे नाही, तर ‘या’ व्यक्तीमुळे.., ऋतुराजने ७ षटकारांच श्रेय दिलं ‘या’ खास व्यक्तीला; म्हणाला…
west bengal : आधी कृष्णभक्तीला विरोध, नंतर म्हणायचा मुस्लीम कबुल कर; रशियन तरुणीने घटस्फोट घेत हिंदू तरूणाशी…
मनसेची सपशेल माघार! राज ठाकरेंना धमकावणाऱ्या ब्रिजभूषणच्या पुणे दौऱ्याला मनसेचा विरोध नाही

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now