एखादा चित्रपट हिट जाण्यामागे भक्कम स्क्रिप्ट, स्क्रीन प्ले, अभिनय कौशल्य अशी अनेक कारणे असतात. एखाद्या चित्रपटात हे सर्व असेल तर तो चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. मग ती बॉलीवूड इंडस्ट्री असो किंवा इतर कोणतीही इंडस्ट्री. (who is ajay purkar)
साऊथच्या पुष्पा, बाहुबली आणि केजीएफ सारख्या चित्रपटांनंतर आता मराठी चित्रपट मोठ्या पडद्यावर आपली छाप सोडत आहेत. नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘पावनखिंड’ या मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असून सोशल मीडियावरही या चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे.
हा चित्रपट मराठा योद्धा बाजी प्रभू देशपांडे यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांना सिद्धी जौहरपासून सोडवण्यासाठी मराठा सेनानीची लढाई दाखवण्यात आली आहे. वीर शिवाजी महाराजांना जौहरच्या तावडीतून सोडवण्यासाठी योद्धा बाजी प्रभू मराठा सैनिकांना कसे हाताळतात हे पाहण्यासारखे आहे. या चित्रपटात मराठा योद्ध्यांच्या बलिदानाची आणि पराक्रमाची कथा दाखवण्यात आली आहे.
या चित्रपटात बाजी प्रभुंची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचे नाव अजय पुरकर असे आहे. बाजी प्रभुंची भूमिका साकारण्यासाठी अजय पुरेकरने पुरेपुर मेहनत घेतली आहे. तसेच त्याने घेतलेले कष्टामुळे त्याचे अभिनय ही उत्तम झालेला आहे. त्यामुळे प्रेक्षकही त्याचे कौतूक करत आहे.
या चित्रपटासाठी चिन्मय मांडलेकरने शिवरायांची भूमिका साकारली आहे. मृणाल कुलकर्णी, प्राजक्ता माळी यांनीही या चित्रपटात भूमिका साकारल्या आहे. पण सगळ्यात जास्त चर्चेचा विषय अजय पुरकर ठरला आहे. त्याचे अभिनयचाही सर्वत्र कौतूक होत आहे.
अजय हा एक उत्तम अभिनेता आहे. त्याने टिव्हीवर ऐतिहासिक भूमिका साकारलेली आहे. अजय पुरकर यांनी पहिली ऐतिहासिक भूमिका प्रतापराव गुजर यांची साकारलेली होती. नितीन चंद्रकांत देसाई यांच्या राजा शिवछत्रपतीमध्ये ही भूमिका होती. बाजी प्रभूंच्या भूमिकेबद्दल बोलताना अजय म्हणाला, हे माझा भाग्य आहे की मला ही भूमिका साकारायला मिळाली.
या पात्राची भूमिका साकारण्यासाठी अजय पुरकरने खुप मेहनत घेतली आहे. बाजी प्रभूंसारखी शरीर यष्टी तयार करण्यासाठी अजय सकाळी ५ वाजता जिमला जायचा. तसेच वजन आपले स्थिर रहावे, त्यासाठी तो आहारही त्यापद्धतीने घ्यायचा, यामध्ये ट्रेनरचेही मोठे योगदान आहे.
उत्तम अभिनेत्यासोबतच अजय पुरकर हा एक उत्तम गायकही आहे. सारेगमपा या शोमध्ये त्याने लागा चुनरी में दाग, नमक इश्क का ही गाणी गायली होती फर्जंद चित्रपटात अजयने मोत्याजी मामा यांची भूमिका साकारली होती. असंभव मालिकेत त्यांनी इन्स्पेक्टर वजलवारची भूमिका साकारली होती. या मालिकेतून त्याला खुप लोकप्रियता मिळाली होती.
महत्वाच्या बातम्या-
‘दहशतवाद्यांशी संबंध असणाऱ्या मंत्र्याला भर चौकात.., आमदार महेश लांडगेंचे वादग्रस्त वक्तव्य
क्रुर पत्नी! सुट्टीवर आलेल्या सैनिक पतीची प्रियकरासोबत मिळून केली हत्या, पोलिसांनी असा लावला छडा
आता किरीट सोमय्यांच्या अडचणी वाढल्या, मुलाच्या अटकपुर्व जामीनासाठी न्यायालयात धावपळ