Share

‘त्यांच्या जेवणाची, राहण्याची सोय आम्ही केली तुम्ही नाही’, रोमानियातले महापौर केंद्रिय मंत्र्यावर संतापले

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी सरकार पूर्ण प्रयत्न करत आहे. मुख्य म्हणजे या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे सुध्दा रोमानियाला गेले आहेत. त्याचाच एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ते रोमानियाच्या महापौरांचे आभार मानताना दिसत आहेत.

जेव्हा शिंदे रोमानियात गेले त्यावेळी त्यांनी भारतीय विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी ते भारत सरकारचे कौतुक करत असतानाच त्यांना रोमानियाच्या महापौरांने अडवले आणि म्हटले की, या विद्यार्थ्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था आम्ही केली आहे, तुमच्या सरकारने नाही. त्यानंतर महापौरांनी शिंदे यांना फक्त स्वता:विषयी बोलण्यास सांगितले.

यावर शिंदे थोडे अस्वस्थ झाले. शिंदे म्हणाले की, मला काय बोलायचे ते मी ठरवेन. यावर परत महापौरांनी शिंदे यांना स्वता:विषयी बोलण्याची ताकद केली. यावेळी भारतीय विद्यार्थी सुध्दा महापौरांना पाठिंबा देत टाळ्या वाजवत होते. यानंतर शिंदे म्हणाले, आम्ही सर्व भारतीय विद्यार्थ्यांना प्रत्येक शिबिरातून बाहेर काढू. यासाठी रोमानिया सरकारचे खूप खूप आभार.”

हा सर्व प्रकार व्हिडीओमध्ये कैद झाला आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर अनेक वेगवेगळ्या प्रतीक्रिया दिल्या आहेत. दरम्यान भारत सरकारने युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी ऑपरेशन गंगा सुरु केले आहे. या ऑपरेशन गंगा मार्फत मोदी सरकारच्या चार मंत्र्यांना युक्रेनच्या आसपास असलेल्या देशांमध्ये पाठवण्यात आले आहे.

नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे देखील त्यापैकी एक आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यांनतर काँग्रेस नेते सलमान निजामी यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, जुमला भारतात काम करतो पण परदेशात नाही.

पहा रोमानियाच्या महापौरांनी ज्योतिरादित्य शिंदे यांना रिलीफ कॅम्पमध्ये कसा धडा शिकवला, तुम्ही येथून कधी निघणार आहात. आम्ही मदत शिबिरात जागा आणि अन्न देत आहोत, तुम्ही नाही,” तसेच महापौरांनी सुनावल्यानंतर विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवल्याचे देखील निजामी यांनी सांगितले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार ‘ऑपरेशन गंगा’ मार्फत आतापर्यंत सुमारे ८००० विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना युक्रेनमधून भारतात आणण्यात आले आहे. परंतु तरी देखील कित्येक विद्यार्थ्यी आणि नागरिक या युध्दजन्य परिस्थितीत अडकले आहेत. त्यामुळे रशियाने युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी सहा तास युद्ध थांबवण्याच्या मोदी सरकारच्या मागणीला मान्य केले आहे.

महत्वाच्या बातम्या
भाजपला मोठा झटका, माजी राज्यमंत्री हाती बांधणार घड्याळ, २ एप्रिलला करणार पक्षप्रवेश
VIDEO: बीडच्या शिक्षिकेचा जगभरात बोलबाला, शिकवण्याची पद्धत पाहून परदेशी विद्यार्थीही हैराण
तेव्हा ममता बॅनर्जींनी मला फोन केला आणि म्हणाल्या…; शरद पवारांनी सांगितला नवाब मलिकांच्या अटकेनंतरचा ‘तो’
किस्सा

‘ही’ नंबर प्लेट असेल तर कोणत्याच राज्यातील पोलिस तुम्हाला अडवणार नाहीत, वाचा केंद्राच्या नवीन प्रोजेक्टबद्दल..

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now