ट्रेकिंगमुळे गड किल्ले कसे आहेत याचा अभ्यास करता येतो. मात्र, ट्रेकिंगदरम्यान अनेक धोके पत्करून ट्रेकर्स ट्रेकिंगला जातात. ट्रेकिंग करताना अनेकदा जीवनमरणाचा प्रश्न उपस्थित होतो. यात कधी कधी जीवही गमवावा लागतो.
पुण्यातील मुळशी आणि मावळ तालुक्यांच्या सीमेवर असलेल्या टेल-बेल किल्ल्यावर एक धक्कादायक घटना घडली आहे. तेल-बेल किल्ल्यावर ट्रेकिंग करताना एक ट्रेकर रोप वे तुटल्याने 200 फूट खाली पडल्याची घटना समोर आली आहे.
सोमनाथ बळीराम शिंदे (Somnath Shinde, 25 वर्षे) असे मृत ट्रेकरचे नाव असून गेल्या रविवारी ( 11 डिसेंबर) ही दुर्दैवी घटना घडली. अनेक गडकिल्ले सर करणारे ट्रेकिंग स्टार सोमनाथ शिंदे यांचे आज दुर्दैवी निधन झालं आहे. या घटनेमुळे ट्रेकर्सच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
माध्यमातील माहितीनुसार, सोमनाथ हे त्याच्या नऊ मित्रांसह टेल-बेल किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेले होते. ते किल्ल्यावर रोप वे बांधण्याचे काम करत होते. हे करत असताना त्याचे मित्र बनवलेल्या रोप-वेने गड चढत होते. चढाई दरम्यान अचानक रोप वे तुटला. त्यामुळे सोमनाथला सावरायला वेळ मिळाला नाही. तो 200 फूट खाली दरीत पडला.
दरम्यान, सोमनाथ हे सोलापूर जिल्ह्यातील तुळजापूरच्या जवळच्याच गावचे रहिवासी आहेत. ते कधीच कोणा विषयी वाईट बोलत नव्हते. निखळ, निर्मळ, स्वच्छ मनाचा तरुण म्हणून त्यांची मित्र परिवारात ओळख होती. सोमनाथ शिंदे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर जगले.
सोमनाथ नेहमी म्हणायचा की, सोमनाथ शिंदेचा शेवटही या सह्याद्रीच्या कुशीतच होईल. मराठ्याची अवलाद आहे. मरणाला भीत नाही. आपलं सर्वस्व सह्याद्रीच आहे. त्याच्या कुशीत मरण आलं तर मी भाग्यवंत असेन.
सोमनाथ यांच्या मृत्यूनंतर त्यांना शिवप्रेमींसह गिर्यारोहकांनी ‘सह्याद्रीपुत्र’ म्हणत त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच सोमनाथ हे काही काळापासून पुण्यातील कात्रज परिसरात राहत होता. त्यांच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर संपूर्ण कात्रज परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या –






