Share

१० मिनिटांच्या नियोजनातच वसंतदादा पाटलांनी फोडला होता ब्रिटीशांचा तुरुंग; वाचा थरारक किस्सा..

महाराष्ट्र माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील (vasantdada patil) यांना कधीच विसरु शकत नाही. वसंतदादा एक स्वातंत्र्यसेनानी होते. देशासाठी पाठीवर गोळी खाणारे वसंतदादा एकमेवच नेते होते. ब्रिटीशांच्या काळात त्यांनी स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला होता. वसंतदादा यांनी कृषी क्षेत्रात सहकार क्षेत्रात पण चांगली कामगिरी बजावली होती.

स्वातंत्र्य लढ्याने आक्रमक आणि निर्णायक वळण घेतले होते तेव्हा पेटा आणि पेटवा अशी भुमिका घेऊन त्यांनी लढ्यास सुरुवात केली होती. पद्माळे गावातील एका मळ्यातील छप्पर हे त्यांच्या आंदोलन लढ्याचे केंद्र बनले होते. त्याठिकाणाहूनच ते आपल्या प्रत्येक गोष्टींचे नियोजन करायचे.

टेलिफोनच्या तारा तोडणे, रेल्वे रुळावरुन घसरवने. पोलिसांवर हल्ला करणे त्यासाठी पैसा आणि शस्त्र गोळा करणे. शस्त्र मिळवण्यासाठी इंग्रजांच्या मालमत्तेवर दरोडे टाकणे, यांचे नियोजन ते करायचे. या सर्व गोष्टी सुरु असाताना पोलिसांनी वसंतदादा आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पकडले.

त्यांना सांगलीच्या तुरुंगात ठेवण्यात आले होते. बाहेर स्वातंत्र्य संग्राम सुरु होता त्यामुळे त्यांना तुरुंगात पडून राहणे आवडत नव्हते. त्यांना तुरुंगाच्या बाहेर पडायचे होते, त्यामुळे त्यांनी तुरुंग तोडण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी तुरुंगातून बाहेर पडण्याचा प्लॅन बनवला.

तसेच क्रांतिकारांशी संवाद साधण्यासाठी त्यांनी सांकेतिक भाषा तयार केली. जे काही करायचे ते १० मिनिटांतच करायचे हे वसंतदादांनी ठरवले होते. अण्णासाहेब पत्रावळे आणि बाबुराव जाधव त्यावेळी स्थानबंद होते. त्यामुळे ते तुरुंगात मुक्तपणे संचार करु शकत होते. पण वसंतदादांना दिवसातुन २ वेळा शौचासाठी बंदोबस्तात बाहेर सोडले जायचे आणिँ पुन्हा त्यांना खोलीत बंद केले जायचे.

वसंतराव गुन्हेगार कसे आहे, हे सिद्ध करण्यासाठी पोलिसांनी पुरावे सादर केले होते. निकाल लागण्याचा दिवस आला होता. त्याचा निकाल काय लागणार होता हे सर्वांना माहित होते, त्यामुळे त्याआधीच त्यांनी तुरुंगात पळुन जाण्याचे ठरवले. त्यादिवशी शनिवार होता, शनिवार हा दिवस सांगलीचा आठवडे बाजार होता.

तेव्हा वसंतदादांचे वकील यांचे सेशन कोर्टात काम निघाल्याने निकालाची तारीख पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे निकाल सोमवारी लागणार होता. आठवड्याबाजार असल्याने काही कर्ममचाऱ्यांना बाजारात जायचे होते. शुक्रवारी वसंतदादांनी त्यांच्या सहकाऱ्यांना तुरुंगातील स्वच्छालयातुन कसे पळायचे हे सांगून ठेवले होते.

हिंदुराव पाटील या सहकाऱ्याने आपल्या खोलीकडे जाताना पत्रावळेच्या लग्नाला जाऊ की सिनेमाला जाऊ असा सांकेतिक भाषेत निरोप दिला. रुमाल उंचावून सर्व सहकाऱ्यांना त्यांनी इशारा दिला होता. तेव्हा सहकाऱ्यांनी लगेच आपल्या बाजूला असलेल्या पोलिसांवर हल्ला करण्यास सुरुवात केली आणि त्यांची शस्त्र हिसकावून घेतली.

दुपारी अडीचच्या सुमारास वसंतदादा आणि हिंदुराव स्वच्छतेसाठी खोलीतून बाहेर पडले. त्यावेळी वसंतदादांनी परिस्थितीचा अंदाज घेत जवळच्या पोलिसाच्या हातातली बंदूक घेऊन त्याच्यावर हल्ला चढवला आणि अवघ्या १० मिनिटांच्या नियोजनात त्यांनी तुरुंगातुन पळ ठोकला.

महत्वाच्या बातम्या
प्रचंड पैसै असूनही मुलाला वाचवू शकले नाही मायक्रोसॉफ्टचे सीईओ, ‘या’ दुर्मिळ आजाराने झाला मुलाचा मृत्यु
जगातील सर्वात मोठी आणि शक्तिशाली सेना कोणत्या देशाकडे आहे? वाचून आश्चर्य वाटेल
‘तू चुकीच्या व्यक्तीला निवडलंस’; कॅन्सरशी झुंज देणाऱ्या अभिज्ञा भावेच्या पतीची भावूक पोस्ट
२० वर्षांनी लहान प्रियकरासाठी महिलेने उचलले भयानक पाऊल; लव्हस्टोरी ऐकून डोके चक्रावेल

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now