Share

शिवसेना भाजप एकत्र येण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी स्वत:च दिले होते संकेत; तेव्हा शिंदे म्हणाले होते ठाकरेंचा आदेश…

सध्या शिवसेनेसोबत बंडखोरी केलेले एकनाथ शिंदे आणि त्यांना पाठिंबा देणारे आमदार चर्चेचा विषय ठरले आहेत. यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरेंनी त्यानंतर वर्षा बंगला सोडला आहे. ते पुन्हा मातोश्रीला आले आहेत. त्यांनी राजीनामा द्यायचीही तयारी दाखवली आहे. तर दुसरीकडे संजय राऊत बंडखोर आमदारांवर जोरदार टीका करत आहेत. पण काही दिवसांपुर्वी उद्धव ठाकरेंनीच भाजपसोबत युतीचे संकेत दिले होते.

झालं असं होतं की, औरंगाबादमध्ये मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या दिनाच्या पार्श्वभूमीवर एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी एकाच व्यासपीठावर हजेरी लावली होती.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात करताना भाजपा मंत्र्यांचा उल्लेख करत ‘एकत्र आलो तर भावी सहकारी’ असा केला. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या सूचक वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात सर्वत्र चर्चा सुरू झाली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘आजी माजी आणि एकत्र आले तर भावी’ असा उल्लेख करत भाषणाची सुरुवात केली त्यांच्या या उल्लेखामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगू लागल्या होत्या. त्यामुळे पूर्वी सोबत असलेली भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र येणार का? अशा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी सर्वांसमोर उपस्थित केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय पटलावरून वेगवेगळ्या प्रतिक्रीया येत होत्या.

त्यानंतर यावर शिवसेनेचे नेते व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आमचे पक्षप्रमुख आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्याच आदेशाने काम करत असतो. उद्धव ठाकरेंचा आदेश हा आमच्यासाठी अंतिम आहे. तसेच राजकारणामध्ये काहीही घडू शकते म्हणून युती संदर्भात निर्णय घेण्याचा सर्वस्वी अधिकार त्यांचाच आहे. असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी त्यावेळी केलं होतं.

शिवसेनेने भाजपची साथ सोडत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत मैत्रीचा हात पुढे करत महाविकास आघाडीची स्थापन केली. यामुळे शिवसेना आणि भाजप यामध्ये वैर निर्माण झाले हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याने शिवसेना आणि भाजप एकत्र येणार अशा चर्चा रंगल्या होत्या.

दरम्यान, त्यानंतर आजचं चित्र जर आपण पाहिलं तर एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली आहे. वेगळा गट स्थापन करून ते लवकरच भाजपसोबत जाऊ शकतात असं चित्र आता निर्माण झालं आहे. उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे की भाजपासोबत युती करणार नाही. त्यासाठी राजीनामा द्यायचीही त्यांची तयारी आहे.

महत्वाच्या बातम्या
स्वार्थासाठी इकडून तिकडे उड्या मारणे माझ्या रक्तात नाही, माझी निष्ठा केवळ शिवसेनेशी – एकनाथ शिंदे
महाविकास आघाडीला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, आमदारांना १२ जूलैपर्यंत अपात्र ठरवता येणार नाही
..तर चिमट्यानेही मी अशा सत्तेला हात लावणार नाही, अटलबिहारी वाजपेयींचे ते भाषण होतंय व्हायरल
‘…यामुळे बाळासाहेब ठाकरे नेहमी आनंद दिघेंवर रागवायचे’; उद्धव ठाकरेंनी सांगितला ‘तो’ किस्सा

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now