Share

…तर शिंदेचा पुर्ण प्लॅन फसेल आणि बंडखोर आमदारांचे राजकीय करीअरही उद्धवस्त होईल

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात काय सुरू आहे हे कोणालाही सांगण्याची गरज नाही. शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंनी काही आमदारांसोबत मिळून बंडखोरी केली आहे. महाविकास आघाडी सरकारमधून शिवसेनेने बाहेर पडावे आणि भाजपसोबत युती करावी अशी त्यांची अट आहे. पण ही अट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऐकायला तयार नाहीत.

एकनाथ शिंदे गट स्वत:च भाजपासोबत जाऊन राज्यात सरकार स्थापन करू शकतो असं बोललं जात आहे. त्यासाठी त्यांना बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. पण असं एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाता येतं का? कायदा काय सांगतो? जरी एकनाथ शिंदेंनी भाजपामध्ये प्रवेश केला तर पक्षांतरबंदी कायद्यानुसार त्यांचं सदस्यत्व रद्द होऊ शकतं आणि पुढील 6 वर्षे त्यांना निवडणूक लढवता येत नाही.

याला एकच अपवाद आहे की पक्षांतर करताना परिस्थिती काय आहे? जर आमदारांनी पक्षाचा व्हीप मानला नाही किंवा संबंधित पक्षाचा राजीनामा दिला त्यांचं सदस्यत्व आपोआप रद्द होतं. हा कायदा विधानसभा आणि लोकसभा दोन्ही ठिकाणी लागू होतो. पण हा कायदा तेव्हाच लागू होतो जेव्हा कोणत्याही आमदाराने किंवा खासदाराने स्वताहून आपल्या पक्षाचा राजीनामा दिला असेल तर.

दुसरी गोष्ट अशी की, कोणताही निवडून आलेल्या आमदाराने किंवा खासदाराने पक्षाच्या आदेशांचं किंवा विचारसरणीचं उल्लंघण केलं तर. पण या कायद्याला एक अपवाद आहे. जर कोणत्याही पक्षाचे दोन तृतीयांश आमदार किंवा खासदार दुसऱ्या पक्षात जात असतील तर त्यांचं सदस्यत्व रद्द होत नाही.

याचा अर्थ असा होतो की, जर एकनाथ शिंदेंना भाजपात जायचं असेल तर त्यांना शिवसेनेच्या दोन तृतीयांश आमदारांचं समर्थन असायला पाहिजे आणि त्यांनी शिंदेंसोबत नवीन गट स्थापन केलेला असावा. तो गट जर कोणत्या पक्षात विलीन केला तरच ही बंडखोरी ग्राह्य धरली जाते. जर विलीनीकरण झालं नाही तर विधानसभा उपाध्यक्ष त्या आमदारांनी अपात्र करू शकतात. आणि मग ते आमदार ६ वर्षे कुठलिही निवडणूक लढवू शकत नाहीत

असं झालं तर त्या आमदारांचं राजकीय करीअर उद्धवस्त होईल. दरम्यान, सध्या ठाकरे सरकारच्या अडचणी वाढताना दिसत आहेत कारण राज्यपालांनी त्यांना उद्यापर्यंत बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं आहे. तिथे हे आमदार काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं आहे.

उद्या बहुमत चाचणी होणार आहे. नवाब मलिक आणि अनिल देशमुखांनी बहुमत चाचणीच्या मतदानासाठी परवानगी मिळाली यासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. असं बोललं जात आहे की, शिंदे गट लवकरच भाजपात सामिल होऊ शकतो. ही शक्यता नाकारता येत नाही. आता उद्या काय होईल? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

महत्वाच्या बातम्या
..तेव्हा लाखोंची ऑफर मिळूनही अक्षयने शिल्पाबद्दल एक शब्दही तोंडातून काढला नाही, वाचा किस्सा
बॉलिवूडचा ‘हा’ अभिनेता अनेकांसाठी आहे देवता, गरीबीतून उभं केलंय करोडोंचं विश्व
देवेंद्र फडणवीसांचे मॉडेलिंग करतानाचे फोटो व्हायरल; नेमकं काय आहे प्रकरण?
पुण्याचं नाव बदलून जिजाऊनगर करण्यात यावं, काँग्रेसची मंत्रिमंडळ बैठकीत मागणी

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now