Share

सुशांत काल माझ्या स्वप्नात आला, त्याने मला सांगितले की…; पहा काय म्हणाली होती म्हणतेय रिया

सुशांत सिंग राजपूत आता या जगात नाही. मात्र त्याच्या आठवणी आजही लोकांच्या मनात ताज्या आहेत. आज त्याच्या मृत्युला २ वर्षे पुर्ण झाले आहेत. यानिमित्ताने अनेकांनी त्याच्या आठवणींना उजाळा दिला. त्यामध्ये रिया चक्रवर्ती, सुशांतची बहिण इ. लोकांचा समावेश आहे. रियाचं आणि सुशांतचं नातं काय होतं हे सगळ्यांना माहिती आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात अनेक खुलासे त्यावेळी झाले होते. त्यातल्या त्यात मुंबई पोलिसांवरही अनेक आरोप प्रत्यारोप झाले होते. हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले गेले होते आणि सीबीआयने अनेक लोकांची चौकशी केली होती. त्यामध्येही अनेक खुलासे झाले होते.

सुशांतच्या वडिलांनी सुशांतच्या आत्महत्येला रियाला दोषी ठरवत अनेक आरोप केले होते. पण तिच्यावर झालेल्या आरोपांवर तिने अनेकदा मौन सोडले आणि अनेक दावे केले होते. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रिया बोलत होती. तिने या मुलाखतीत अनेक खळबळजनक खुलासे केले होते ज्यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण आले होते.

तिला या मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला की, तू मौन सोडण्यासाठी आजचाच दिवस का निवडला? त्यावर रिया म्हणाली की, रात्री सुशांत माझ्या स्वप्नात आला होता. आणि त्याने मला सगळ्यांसमोर सत्य सांगण्यास सांगितले. त्यानंतर सगळेच हैराण झाले होते.

दरम्यान, या मुलखतीत तिने सुशांत आणि तिच्या नात्यातील अनेक खुलासे केले होते. तिच्यावर सुशांतच्या वडिलांनी लावलेल्या आरोपांवरही तिने मौन सोडले होते. रियावर सुशांतच्या वडिलांनी आरोप लावला होता की, रिया सुशांतला त्याच्या कुटुंबापासून दूर नेत आहे.

मुलाखतीमध्ये ती म्हणाली की, जर मी सुशांतला कुटुंबापासून दूर नेत होते तर तुम्ही मला सुशांतपासून दूर का केले नाही? असा प्रश्न तिने मुलाखतीच्या माध्यमातून सुशांतच्या वडिलांना विचारला होता. रिया चक्रवर्तीला अटकही झाली होती ज्यानंतर ती अनेक दिवस जेलमध्ये होती. तिला जेलमध्ये टाकल्यानंतर अनेक कलाकारांनी रियावर अन्याय होत असल्याचे सांगितले होते.

महत्वाच्या बातम्या
सासूचे निधन झाले तरी १५ मिनीटं खिदळत होती ‘ही’ बॉलिवूड अभिनेत्री, वाचून तुम्हीही व्हाल अवाक 
नवऱ्यासाठी निर्जळी उपवास अन् वडाला फेऱ्या मारण्यापेक्षा…; अभिनेत्रीने महीलांना दिला ‘हा’ सल्ला
मागच्या वेळी मोदींसमोरच राज्यपालांना खडे बोल सुनावल्यामुळे मोदींनी घेतला अजितदादांचा धसका, म्हणूनच काल..
मागच्या वेळी मोदींसमोरच राज्यपालांना खडे बोल सुनावल्यामुळे मोदींनी घेतला अजितदादांचा धसका, म्हणूनच काल..

 

ताज्या बातम्या बाॅलीवुड

Join WhatsApp

Join Now