Share

 RSS ची रुग्णालयं फक्त हिंदूसाठीच आहेत का? रतन टाटांच्या या प्रश्नावर गडकरी म्हणाले..

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एकदा रतन टाटा यांना सांगितले की भारतीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) धर्माच्या आधारावर भेदभाव करत नाही. हा किस्सा स्वता नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात सांगितला आहे. खरं तर गडकरी महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री असताना आरएसएसच्या हॉस्पिटलचे उद्घाटन होणार होते.

दिवंगत संघ प्रमुख हेडगेवार यांच्या नावावरून औरंगाबादेत हे रुग्णालय बांधण्यात आले. त्यावेळी संघाच्या एका पदाधिकाऱ्याने रतन टाटा यांनी या रुग्णालयाचे उद्घाटन करावे, अशी इच्छा गडकरी यांच्याकडे व्यक्त केली. यानंतर गडकरींनी रतन टाटा यांच्याशी बोलून त्यांचे मन वळवले आणि त्यांना या कामासाठी तयार केले होते.

यादरम्यान आरएसएसच्या रुग्णालयात फक्त हिंदूंवरच उपचार केले जातात का? असा सवाल रतन टाटा यांनी केला होता. गडकरी म्हणाले की, रतन टाटा यांना रुग्णालयाच्या उद्घाटनाबाबत विचारले असता रतन टाटा म्हणाले होते की, त्यांनी स्वता कधीच कोणत्या कारखान्याचे उद्घाटन केले नाही.

नितीन गडकरींनी सांगितलं की, रतन टाटा म्हणाले, की नितीन जी, मी कधीही माझ्या कारखान्याचे उद्घाटन केले नाही… मी कधीच त्यासाठी गेलो नाही, मला भाषण कसे करावे हे देखील माहित नाही. तेव्हा गडकरींनी त्यांना सांगितले की, तुम्ही टाटा कॅन्सरची स्थापना केली, जिथे देशभरातून लोक उपचारासाठी येतात.

यानंतर रतन टाटा म्हणाले की, मी तुम्हाला नकार देऊ शकत नाही, त्यामुळे उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. त्यानंतर रतन टाटा स्वतः विमानात बसून रतन टाटा औरंगाबादला पोहोचले होते. यानंतर गडकरींनी उद्घाटन समारंभाचा किस्सा सांगितला. ते म्हणाले की, संघाच्या रुग्णालयाची माहिती मिळाल्यावर रतन टाटा यांनी त्यांना विचारले की, ते फक्त हिंदूंसाठी आहे, इथे फक्त हिंदूंवरच उपचार होणार का?

रतन टाटांच्या या प्रश्नावर गडकरी म्हणाले की, येथे सर्व धर्माच्या लोकांना समान वागणूक दिली जाणार नाही, संघ धर्माच्या आधारावर भेदभाव करत नाही. नितीन गडकरी पुण्यातील सिंहगड परिसरात एका धर्मादाय रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी आले होते, तिथे त्यांनी हा किस्सा शेअर केला. त्यावेळी गडकरी म्हणाले की, ते १० टक्के राजकारण आणि ९० टक्के समाजकार्य करतात.

महत्वाच्या बातम्या
आलियाच्या कलिऱ्यांमध्ये आणि मंगळसुत्रामध्ये दडलाय ‘हा’ खास आकडा, रणबीरशी आहे थेट संबंध
आज ऋषी कपूर जीवंत असते तर.., रणबीरच्या डोक्याला बाशिंग पाहून नीतू कपूर पतीच्या आठवणीत भावूक
राकेश झुनझुवालांच्या ‘या’ ५ स्टॉक्सवर डोळे झाकून ठेवा विश्वास, करून देत आहेत प्रचंड कमाई
असा डाकू ज्याने चंबलमध्ये एकाही मुलीवर बलात्कार होऊन दिला नाही, अटक झाली तेव्हा झाली होती तुंबड गर्दी

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now