Share

एकनाथ शिंदे दिघे साहेबांचा आदर्श सांगतात पण ते कधीच दिघे साहेब होऊ शकत नाही; मनसेने शिंदेंना जागा दाखवली होती

शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी ४६ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. यामुळे शिवसेना पक्षाला मोठा धक्का बसला आहे. या बंडखोरीमुळे महाराष्ट्रात राजकीय संकट निर्माण झालं आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शिंदे गटाला भाजपचा पाठिंबा असल्याची माहिती मिळत आहे. भाजप शिंदे गटातील आमदारांना सोबत घेऊन सरकार स्थापन करणार असल्याचे सांगितले जात आहे. यासाठी भाजपकडून ‘ऑपरेशन लोटस’ राबविण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. महत्वाची बाब म्हणजे महाराष्ट्राप्रमाणेच राजस्थानमध्ये देखील ‘ऑपरेशन लोटस’ सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. यादरम्यान मनसेने एकनाथ शिंदेंबाबत एक वक्तव्य केलं होतं जे पुन्हा चर्चेचा विषय ठरत आहे.

कल्याण ग्रामीण भागातील पाण्याची समस्या काही दिवसांपुर्वी गंभीर झाली होती. कल्याण ग्रामीण भागात असणाऱ्या देसलपाडा गावातील पाच जणांना पाण्यामुळे आपला जीव गमवावा लागला होता. यावरून कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी शिवसेनेचे नेते आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्यावर निशाणा साधला होता.

मनसे आमदार राजू पाटील यांनी कल्याण ग्रामीण भागातील पाणी टंचाईच्या समस्येवरून ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. एकनाथ शिंदे दिघे साहेबांचा आदर्श सांगून त्यांच्यासारखे असल्याचे भासवतात. परंतु शिंदे साहेब दिघे साहेब होऊ शकत नाहीत”, असा खोचक टोला मनसे आमदार राजू पाटील यांनी लगावला होता.

कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना हे वक्तव्य केलं होतं. यावेळी कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील म्हणाले की, “पाणी टंचाईच्या मुद्द्यावरून गेली दीड वर्षे झाले मी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट मागत आहेत. अजूनही मला पालकमंत्री एकनाथ शिंदे भेट देत नाहीत.”

“सोमवारी पाणी टंचाईच्या मुद्द्यावर मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी या बैठकीची मागणी केली होती. या बैठकीला मला देखील येण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी मी सचिव प्रतिभा पाटील यांच्याकडे केली. त्यावर मला बैठकीसाठी परवानगी नाकारण्यात आली. पालकमंत्री अशाप्रकारचे राजकारण करत असतील तर ही दुर्देवाची गोष्ट आहे”, असे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी सांगितले होते.

कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील पुढे म्हणाले की, “तुम्ही दिघे साहेबांचा आदर्श सांगून त्यांच्यासारखे असल्याचे भासवता. पण दिघे साहेबांनी टक्केवारीचे राजकारण कधी केले नाही. पालकमंत्र्यांनी त्यांचा आदर्श घ्यावा. शिंदे साहेब दिघे साहेब होऊ शकत नाहीत. त्यांनी पुत्र मोहात न अडकता लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन काम करावे”,असे देखील कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील म्हणाले होते.

“कल्याण डोंबिवली महापालिका भागातील २७ गावांपैकी १८ गावे वगळण्याचा प्रश्न न्यायालयात सुनावणी सुरू होती. यामुळे या १८ गावांमध्ये कोणत्याही सोयी-सुविधा पुरवण्यात आलेल्या नाहीत. याबाबत अनेकवेळा कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. तरी देखील महापालिका प्रशासनाकडून कोणत्याही सुविधा पुरवण्यात आलेल्या नाहीत”, असे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी त्यावेळी सांगितले होते.

महत्वाच्या बातम्या :-
‘…यामुळे बाळासाहेब ठाकरे नेहमी आनंद दिघेंवर रागवायचे’; उद्धव ठाकरेंनी सांगितला ‘तो’ किस्सा
सगळ्यांना चकवा देऊन बंडखोर आमदार महाराष्ट्रातून कसे गायब झाले? पोलिस अधिकाऱ्याने केला खुलासा
लग्नानंतर दोन महीन्यातच आलिया भट आणि रणबीर कपूर बनणार आईवडील, गुड न्युज शेअर करत म्हणाले…..
शिवसैनिक आणि बंडखोर आमदाराच्या समर्थकांमध्ये जोरदार राडा, कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now