केसरकर म्हणाले, मी पवारांबद्दल कधीही अपशब्द काढला नाही, आव्हाडांनी ‘तो’ किस्सा सांगत केली पोलखोल

राज्यात नवं सरकार स्थापन झाल्यापासून आरोप – प्रत्यारोप सुरू झाले आहेत. एकेकाळी एकेमकांचे पक्के मित्र पक्ष असलेले आता विरोधक झाले आहेत. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेत उभी फुट पडली आहे. तर दुसरीकडे अख्खं ठाकरे सरकार कोसळले आहे.

यामुळे आता सत्ताधारी आणि विरोधकांमद्धे आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. नुकतच शिंदे गटाचे प्रवक्ते आणि आमदार दिपक केसरकर यांनी एक व्यक्तव्य केलं. ‘शरद पवार यांच्याबद्दल मी कधीही अपशब्द काढले नाहीत. आवश्यकता असेल तर मी पवार साहेबांच्या घरी जाऊन त्यांची दिलगीरी व्यक्त करेल असे वक्तव्य केसरकर यांनी केलं.

तर आता राष्ट्रवादी – कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केसरकरांना जुनी आठवण करून दिली आहे. फेसबुक पोस्ट करत आव्हाड यांनी मोठी पोस्ट लिहिली आहे. शरद पवारांबद्दल बोलल्यानं मला उठावं लागलं, असं मत आव्हाड यांनी आपल्या फेसबुक पोस्ट मधून व्यक्त केलं आहे.

वाचा काय म्हंटलं आहे आव्हाड यांनी फेसबुक पोस्टमध्ये..?
केसरकर मी आपल्या घरी आलो होतो तो साहेबांचा निरोप घेऊन, कि आघाडी धर्मा पाळा. आपली जवळ-जवळ अर्धातास चर्चा झाली व आपण स्पष्ट शब्दांत जी भाषा वापरली ती मी इथे लिहीत नाही. पण, मी कुठल्याही परिस्थितीत मेलो तरी चालेल पण, राणेंचा प्रचार करणार नाही असे सांगून आपल्या दोघांमधील संभाषण थांबले. त्यानंतर मी परत येऊन हाच निरोप आदरणीय शरद पवार साहेबांना दिला. पक्षामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना माहित आहे कि, मी सांगितल्याशिवाय इतका मोठा निर्णय घेणार नाही. मुंबईवरुन येऊन सावंतवाडीमध्ये तुम्हांला निरोप द्यायला इतका मोठा मी पक्षामध्ये नव्हतो. त्यामुळे मला साहेबांनी निरोप दिला हे सत्य लपवू नका.

त्यानंतर शरद कृषी भवन च्या उद्घाटनाला आदरणीय शरद पवार साहेब आले. आपण त्या कार्यक्रमाला आलात आणि साहेबांच्या मागून चालण्याचा प्रयत्न केलात. पुढे सगळे कॅमेरावाले फोटो काढत होते, व्हिडीओ शुटींग करत होते. मी आपल्याला तिथे हटकले हे सत्य आहे. आणि तसेही ते मला सूचित करण्यात आले होते म्हणून मी ते काम केले. कारण, त्या फोटोवरुन पुन्हा एकदा सिंधुदुर्गामध्ये गैरसमज निर्माण झाला असता. कारण आपण जे केले होते ते उभ्या सिंधुदुर्गाला माहिती होते. आणि तुम्हांला तेच करायच होतं.

जिल्ह्यात आणि महाराष्ट्रभर गैरसमज निर्माण करुन द्यायचे होते. तो मी नव्हेच असे चित्र तुम्हांला सिंधुदुर्गामध्ये निर्माण करायचे होते. आपल्याला हटकल, आपल्याला बाजूला केलं ह्याचे मला अजिबात दु:ख नाही. कारण, साहेबांचा निरोप धुडकावल्यानंतर तुम्हांला साहेबांच्या बाजूला किंवा मागे चालण्याची गरजच नव्हती. त्यामुळे केलेल्या गोष्टीची मला खंत नाही. उगाच खोटा आव आणायचा होता. आणि तुम्हांला पक्ष सोडायचा होता. तुमचे ते आधीच ठरलेले होते. तुम्हांला फक्त कारण लागत होतं आणि ते कारण तुम्ही जितेंद्र आव्हाड यांच्यावर बिल फाडून मोकळे झालात.

हिंमत होती तर राणेंचा प्रचार करणार नाही, मी या पक्षात राहणार नाही असा निर्णय का नाही घेतलात अधिक इतिहासात मला जायला लावू नका. आज एवढे बोललो… याच्यानंतर परत तुमच्याबद्दल एक अवाक्षर ही काढणार नाही. कारण, सत्य सांगणं ही काळाची गरज होती. ते मी आज सांगितले.

तुम्ही आज मला खोटे ठरवण्याचा प्रयत्न केला म्हणून हे सत्य कथन.. उद्धव ठाकरेंन बद्दल बोलाल तर खबरदार हि तुमची भूमिका कौतुकास्पद आहे आपण त्यांना 2014 साली भेटलात पण ज्या पवारसाहेबांनी आपले आयुष्य घडविले त्यांच्या बद्दल आपण जे बोललात ते न पटल्या मुळे मी आपल्या बद्दल बोललो गेली 7.6 वर्ष आपण मला दोष देत होतात मी लक्ष हि देत नव्हतो जेव्हा तुम्ही साहेबान बद्दल बोललात तेव्हा मी उठलो .. साहेबां बद्दल बोलू नका … बस

महत्त्वाच्या बातम्या
शिंदे-फडणवीसांच्या ‘त्या’ कृतीवरुन अजित पवार भडकले; शेलक्या शब्दात घेतला समाचार, वाचा काय म्हणाले..
गावात दोन हेलिपॅड पण शाळा, रस्ते, रूग्णालय नाही; उच्च न्यायालयाने मुख्यमंत्र्यांना झापले, म्हणाले…
‘फक्त दोनच मुले जन्माला घालण्याच्या कोणत्याही कायद्याचे समर्थन करणार नाही’- असदुद्दीन ओवैसी
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ‘हा’ खेळाडू बनणार रोहितचे शस्त्र, इंग्लंडला टाकणार संकटात