सध्या शिवसेनेसोबत बंडखोरी केलेले एकनाथ शिंदे आणि त्यांना पाठिंबा देणारे आमदार चर्चेचा विषय ठरले आहेत. यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरेंनी त्यानंतर वर्षा बंगला सोडला आहे. ते पुन्हा मातोश्रीला आले आहेत. त्यांनी राजीनामा द्यायचीही तयारी दाखवली आहे. तर दुसरीकडे संजय राऊत बंडखोर आमदारांवर जोरदार टीका करत आहेत. पण एकेकाळी शिवसेनेचे कट्टर समर्थक असणारे एकनाथ शिंदे बंडखोरी करतील असं कोणाला वाटलं नव्हतं. त्यांचं एक जुनं स्टेटमेंट सध्या पुन्हा व्हायरल होत आहे.
काही दिवसांपुर्वी भाजपची जन आशिर्वाद यात्रा निघालेली होती. या यात्रेदरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे सत्ताधारी पक्षावर निशाणा साधला होता. यात्रेवेळी वसई येथे बोलताना नारायण राणे यांनी नगरविकार मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला होता.
एकनाथ शिंदे हे केवळ सही पुरते उरले असून त्यांच्या सर्व फाईली मातोश्रीमधून मंजूर केल्या जातात असं नारायण राणे म्हणाले होेत. तसेच शिंदे या प्रकाराला कंटाळले असून ते लवकरच मोठा निर्णय घेतील असे सुचक वक्तव्य नारायण राणे यांनी केले होते.
त्यानंतर नारायण राणेंच्या या गंभीर आरोपांवर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली होती. मी निष्ठावान सैनिक असून माझी निष्ठा केवळ शिवसेनेशी आहे. पक्षाने मला ज्या जबाबदाऱ्या दिल्या त्या प्रामाणिकपणे पार पाडणे एवढेच मला माहित आहे. स्वार्थासाठी इकडून तिकडे उड्या मारणे हे माझ्या रक्तात नाही, असा टोला एकनाथ शिंदे यांनी नारायण राणे यांना लगावला होता.
नगरविकास मंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी माझ्यावर जबाबदारी सोपविल्यापासून आजपर्यंत कधीही त्यांनी माझ्या कामात हस्तक्षेप केलेला नाही. त्यांच्याच पाठबळामुळे नगरविकास विभागात अनेक चांगले निर्णय घेता आले, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले होते.
तसेच मुख्यमंत्र्यांच्या पाठबळामुळे अनेक चांगल्या योजना राबवण्याचे कामही सुरु आहे. नारायण राणे साहेब हे स्वत: मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांना एक नक्कीच माहित असणे अपेक्षित आहे की जो राज्याच्या दृष्टीने महत्वाचा निर्णय असतो. तो मुख्यमंत्र्यांच्या संमतीशिवाय मंजूर होत नाही, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले होते.
पुढे एकनाथ शिंदे म्हणाले होते की, माझ्याच नाही तर कोणत्याही विभागाचे धोरणात्मक निर्णय हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा होऊनच घेतले जातात आणि ते योग्यच आहे. मी कंटाळलो, हा जावईशोध नारायण राणे यांनी असाच लावला असावा, असा टोलाही एकनाथ शिंदे यांनी लगावला होता. त्यानंतर त्यांनी आज बंडखोरी केलेली आहे. बंडखोरी केल्यानंतर त्यांचं हे वक्तव्य पुन्हा चर्चेत येत आहे.
महत्वाच्या बातम्या
महाविकास आघाडीला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, आमदारांना १२ जूलैपर्यंत अपात्र ठरवता येणार नाही
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंबाबत आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट करणाऱ्या प्रसिद्ध मराठी अभिनेत्याला अटक झाली होती
खरा हिरो! ५ वर्षांपुर्वी दिलेले वचन केले पुर्ण, रणदीप हुड्डाने सरबजीतच्या बहिणीच्या पार्थिवाला दिला खांदा
‘…यामुळे बाळासाहेब ठाकरे नेहमी आनंद दिघेंवर रागवायचे’; उद्धव ठाकरेंनी सांगितला ‘तो’ किस्सा