देशाच्या गाणकोकिळा लता मंगेशकर (lata mangeshkar) यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. देशासह जगभरातील श्रोत्यांच्या जगण्याला अमृतसंजीवनी देत आलेला स्वर्गीय सूर हरपल्यानं आज संपूर्ण देश शोकाकूल झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून लतादीदी (Lata Didi) यांना आजारी असल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
आज अखेर भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी वयाच्या ९२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात त्यांच निधन झाले आहे. मंगेशकर यांना ८ जानेवारीला करोनाची लागण झाली होती. त्यांना करोनाची सौम्यं लक्षणं जाणवत होती. त्यांना न्यूमोनियाचीही लागण झाल्याचं समोर आलं होतं. आज आम्ही दिलीप कुमार आणि लता मंगेशकर यांच्या नात्याबद्दल सांगणार आहोत.
बॉलिवूडच्या गाणकोकीळा लता मंगेशकर (lata mangeshkar) महान अभिनेते दिलीप कुमार यांना आपला मानलेला भाऊ मानायच्या. केवळ भाऊ मानायच्या नाही तर त्यांनी अनेकवेळा त्यांच्या हातावर राखी बांधली होती. आपल्या मानलेल्या भावाला गमावल्यानंतर लता दीदींनी खुप दुखी झाल्या होत्या. (when dilip kumar helped lata mangeshkar in his case)
एका मुलाखतीदरम्यान आपली व्यथा व्यक्त करताना त्यांनी दिलीप कुमार (dilip kumar) यांच्यासोबतच्या काही आठवणी सांगितल्या ज्या आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. मुलाखतीत लता दीदी म्हणाल्या की, ही बातमी ऐकून मी खुप दुखी झाले आहे पण हीच या जगाची रीत आहे. हे सत्य आपण नाकारू शकत नाही.
दिलीप यांच्याबद्दल सांगताना लता दीदी म्हणाल्या की, ते खूप चांगला गायचे पण पहिल्यांदा त्यांनी माईक पकडला होता तेव्हा ते खुप घाबरले होते. मेहबूब स्टुडिओमध्ये मुसाफिर चित्रपटाच्या गाण्याचे रेकॉर्डिंग चालू होते. ते माइक घेताच घाबरून गेले, त्यानंतर सलिल चौधरी त्यांना म्हणाले, युसूफ घाबरू नकोस, डोळे मिटून गाणे गा.
प्रॅक्टिस म्हणून त्यांनी शास्त्रीय गाणे सुरू केले. दिलीप भैय्याचे डोळे बंद होते आणि ते गाणे म्हणत होते. अशा परिस्थितीत सलील जी त्यांना थांबायला वारंवार सांगत होते, पण ते थांबले नाहीत. नंतर सलील साहेब त्यांच्याकडे आले आणि म्हणाले की हे गाणे जाऊ दे, आधी तू चित्रपटाचे गाणे गा.
लागी छूटे नहीं रामा, चाहे जिया जाए, हे गाणे दिलीप जी यांनी गायले होते.आणखी एक मजेशीर किस्सा सांगताना लता सांगतात, दिलीप साहेबांमध्ये आश्चर्यकारक धैर्य होते. एकदा एका निर्मात्याने माझ्यावर आणि दिलीप भैयावर आरोप केला होता की आम्ही त्यांच्याकडून काळा पैसा घेतो.
अशा परिस्थितीत दिलीप साहेबांना या गोष्टीने खुप त्रास झाला. त्यांनी हे प्रकरण न्यायालयात नेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी स्वत: वकील बनून हा खटला लढवण्याचा निर्णय घेतला होता. हे इतके सोपे नव्हते. ही केस लढण्यासाठी त्यांनी स्वता अभ्यास केला होता.
पुढे लता दीदींना सांगितले की, दिलीप साहेबांनी त्यांच्या सहाय्यकाला बोलावून कोर्टाकडून एक महिन्याचा अवधी मागितला. या दरम्यान त्यांनी वकिलांची सर्व पुस्तके वाचली आणि खटला चालविला. एक दिवस मी फोन करून म्हटले की तु मस्त राहा ताई आपण केस जिंकलो आहोत काळजी करण्याचे काहीच कारण नाही.
त्या निर्मात्याने माझ्यावर ६०० रुपये, दिलीप भैय्या यांच्यावर १००० रुपये आणि एका माणसावर ६०० रूपये घेतल्याचा आरोप लावला होता. त्यावेळी ६०० रुपयेसुद्धा मोठी रक्कम होती. आताच्या काळात आपल्याला ती रक्कम छोटी वाटेल पण त्यावेळी ६०० रूपये म्हणजे खुप होते.
लता म्हणाल्या की त्यांनी मला त्यांची लहाण बहिण मानले होते. मी त्यांना राखी बांधत असे. बर्याच वेळा ते माझ्याकडे येत असत आणि मला काहीतरी हवे असल्यास सांगायचे. एकदा लंडनमधील एका कार्यक्रमादरम्यान दिलीप साहेबांनी माझी स्तुती करताना इतके चांगले शब्द बोलले होते की त्यावेळी तिथे उपस्थित सगळेजण उभे राहिले होते.
सगळेजण उभा राहून टाळ्या वाजवत होते. आजही तो व्हिडिओ सोशल मीडियावर उपस्थित आहे. मी त्यांच्या बुद्धीची आणि त्यांच्या उर्दू तसेच नॉलेजची फॅन होती. इंडस्ट्रीमध्ये असे कलाकार आहेत की त्यांना भेटून बऱ्याच वेळा लोक आश्चर्यचकित व्हायचे.
सोशल मीडियावरही लता दीदींनी एक पोस्ट शेअर करून दिलीप कुमार यांच्याबद्दल अनेक गोष्टी व्यक्त केल्या आहेत. या पोस्टसह त्यांनी बरीच जुनी छायाचित्रेही शेअर केली आहेत. त्याच्यावरून कळते की दिलीप कुमार हे लता दीदींच्या किती जवळ होते.
लता दीदींनी आपल्या पोस्टमध्ये लिहीले आहे की, युसुफ भाऊ, आज तू आपल्या लहान बहिणीला सोडून गेलास आणि निघून गेलास. ते गेल्यानंतर एका युगाचा अंत झाला. मला काहीही समजत नाही. मी निशब्द आणि दुखी आहे. त्यांनी अनेक आठवणी आणि गोष्टी मागे ठेवल्या.
ते बराच काळ आजारी होते, ते लोकांना ओळखतही नव्हते. अशा परिस्थितीत सायरा म्हणजे त्यांच्या पत्नीने स्वतःला विसरून दिवसरात्र दिलीप कुमार म्हणजे त्यांच्या पतीची सेवा केली आहे. मी अशा स्त्रीला सलाम करते. युसुफ भाई यांच्या आत्म्याला शांती मिळो. ही एकमेव माझी प्रार्थना आहे, अशी भावनिक पोस्ट त्यांनी शेअर केली होती.
मुलाखतीत त्यांनी अनेक आठवणी सांगितल्या. दिलीप कुमार यांच्या जाण्याने अनेक लोकांना आणि त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला. पण ते नेहमी त्यांच्या चित्रपटांमुळे आणि अभिनयामुळे लोकांच्या लक्षात राहतील. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.
महत्वाच्या बातम्या
…त्यामुळे मजरूह सुल्तानपुरी लतादीदींचे जेवण स्वत: चाखायचे, कारण वाचून हादरा बसेल
लता मंगेशकरांना आई मानत असे क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर; किस्सा वाचून डोळ्यात पाणी येईल
‘बाळासाहेबांनंतर लतादीदीच आमचा आधार, त्यांच्या जाण्यानं आमच्या परिवारावर मोठा आघात झालाय’
धक्कादायक! १३ फूट मगरीवर ‘या’ व्यक्तीने मारला ताव, खाल्ल तिचं ४०० किलो मांस