Share

श्रीदेवीचा राग कमी करण्यासाठी अमिताभ बच्चनने पाठवली होती टेम्पोभर गुलाबाची फुलं

फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपण अनेकदा कलाकारांमध्ये भांडण होत असतात. ज्यामुळे चित्रपटाच्या निर्मात्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तर कधी कधी चित्रपट बंद करावा लागतो. म्हणून निर्मात्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.

आज आम्ही तुम्हाला बॉलीवूडच्या दोन सुपेरस्टार्सच्या भांडणांबद्दल सांगणार आहोत. यातले एक सुपरस्टार म्हणजे महानायक अमिताभ बच्चन (amitabh bachchan) होते. दुसरा सुपरस्टार म्हणजे बॉलीवूडची पहिली लेडी सुपरस्टार श्रीदेवी (sridevi). या दोघांमध्ये खुप मोठे भांडण झाले होते.

ही गोष्ट आहे ९० च्या दशकाच्या सुरुवातीची. त्यावेळी महानायक अमिताभ बच्चन त्यांच्या करिअरवर टॉपवर होते. त्यांनी बॉलीवूडच्या सर्व अभिनेत्रींसोबत काम केले होते. त्यांचे सगळे चित्रपट सुपरहिट होत होते.

लोकांमध्ये अमिताभ बच्चनचे खुप वेडं होते. म्हणून त्यांचे सगळे चित्रपट सुपरहिट व्हायचे. दुसरीकडे श्रीदेवीने ‘चांदनी’ चित्रपटामध्ये काम केले. म्हणून त्या बॉलीवूडच्या पहिल्या लेडी सुपरस्टार झाल्या होत्या. दिग्दर्शक आपला चित्रपट हिट करण्यासाठी श्रीदेवीला चित्रपटामध्ये घ्यायचे.

ज्यावेळी बॉलीवूडचे हे दोन सुपरस्टार एकत्र यायचे. त्यावेळी चित्रपट हिट व्हायचा. त्यासोबतच नवीन रेकॉर्ड देखील तयार करायचा. म्हणून अनेक दिग्दर्शक त्यांना एकत्र कास्ट करण्यासाठी तयार व्हायचे. अनेक कलाकार चित्रपट या दोघांसाठी लिहिले जायचे.

अमिताभ बच्चन आणि श्रीदेवीने इंकलाब आणि आखरी रास्ता यांसारख्या चित्रपटामध्ये एकत्र काम केले होते. पण आखरी रास्ता चित्रपटा वेळी या दोघांमध्ये भांडण झाले. त्यामुळे श्रीदेवीने अमिताभ बच्चनसोबत कधीच काम न करण्याचा निर्णय घेतला.

याबद्दल बोलताना श्रीदेवी म्हणाल्या की, ‘ज्या चित्रपटामध्ये महानायक अमिताभ बच्चन काम करत असतील. त्या चित्रपटामध्ये दुसऱ्या कोणत्याही कलाकाराला काम करण्यासाठी संधी नसते. अमिताभ बच्चनच सर्व कलाकारांचा अभिनय करतात आणि त्यांच्यामूळेच चित्रपट हिट होतात. दुसरे अभिनेते फक्त नावाला असतात’.

हे ऐकल्यानंतर अमिताभ बच्चनला समजले की, त्यांनी मोठी चुक केली आहे. त्यांनी असे करायला नको होते. अमिताभच्या लक्षात आले की, श्रीदेवी आपल्यावर चांगल्याच चिडल्या आहेत. त्यांना आपला खुप जास्त राग आला आहे. म्हणून आपण त्यांची माफी मागितली हवी.

याच कालावधीमध्ये अमिताभ बच्चन आणि श्रीदेवीला ‘खुदा ग्वाह’ चित्रपटामध्ये एकत्र काम करण्याची संधी मिळाली. पण श्रीदेवीने या चित्रपटाला नकार दिला. अमिताभला मात्र या चित्रपटात श्रीदेवीचं मुख्य अभिनेत्री म्हणून हव्या होत्या.

त्यांनी श्रीदेवीचा राग कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी फोन करून श्रीदेवीची माफी मागितली. पण त्यांनी काहीही उत्तर दिले नाही. अमिताभने श्रीदेवीला भेटण्याचा प्रयत्न केला. तेव्हाही त्यांनी नकार दिला.

शेवटी अमिताभ बच्चनने श्रीदेवी ज्या ठिकाणी शूटिंग करत होत्या. त्या ठिकाणी गुलाबाच्या फुलांनी भरलेला टेम्पो पाठवून दिला. श्रीदेवीला टेम्पोजवळ बोलवण्यात आले आणि दरवाजा उघडण्यात आला. एवढी फुलं बघून श्रीदेवी आनंदी झाल्या. कारण त्यांना फुल खुप आवडायची.

एवढ्या मोठ्या प्रमाणात फुलं बघून त्या आनंदी झाल्या. त्यानंतर अमिताभने परत एकदा श्रीदेवीची माफी मागितली आणि त्यांनी अमिताभला माफ केले. श्रीदेवीने अमिताभसोबत काम करायला तयार झाल्या. पण त्यांनी एक अट ठवली होती.

श्रीदेवीची अट होती की, खुदा ग्वाह चित्रपटामध्ये त्यांचा डबल रोल असेल. नाहीतर त्या काम करणार नाहीत. अमिताभने देखील खुप आनंदाने ही अट मान्य केली. म्हणून या चित्रपटामध्ये श्रीदेवीने मुलगी आणि आई दोघींची भुमिका निभावली होती.

महत्वाच्या बातम्या
नवाब मलिकांनंतर ‘या’ नेत्याचा नंबर, किरीट सोमय्यांच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ
रशियाला नमवण्यासाठी बायडन यांनी धरला भारतीयाचा हात, दलीप सिंग यांना सोपवली मोठी जबाबदारी
ईडीच्या अधिकाऱ्यांना भाजपकडून आमदार, खासदारकीचे बक्षिस; पवारांनी पुराव्यासहित उघडं पाडलं पितळ
राकेश झुनझुनवालांच्या ‘या’ स्टॉकने सहा महिन्यात दिला तब्बल ४००% परतावा, गुंतवणूकदार मालामाल

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now