Share

कश्मीरी पंडीतांच्या हत्याकांडावेळी भाजपचे ८५ खासदार काय करत होते? त्यांच्या पाठींब्यावर सरकार होते

narendra-modi.j

संपूर्ण देशभरात द काश्मिर फाईल्स चित्रपट चर्चेचा विषय ठरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या चित्रपटाचे तोंडभरुन कौतुक करत ‘सातत्याने व्यक्ति स्वातंत्र्याचा झेंडा घेऊन उभी असलेली टोळी या चित्रपटाची बदनामी करत आहे’ असा टोला विरोधकांना लगावला आहे. या पार्श्वभुमीवर काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपवर निशाना साधला आहे.

सुरजेवाल यांनी एकामागोमाग सहा ट्विट करत मोदींना प्रतिउत्तर दिले आहे. १९९० मध्ये जेव्हा काश्मिरी पंडितांना दहशतवादाच्या छायेखाली पळून जावे लागले तेव्हा भाजपाचे ८५ खासदार काय करत होते, ज्यांच्या पाठिंब्यावर केंद्रात व्हीपी सिंग सरकार चालत होते?, ते पंतप्रधान मोदींनी सांगावे. असा सवाल ट्विटरद्वारे सुरजेवाल यांनी विचारला आहे.

तसेच, “देशाच्या पंतप्रधानांना बापूंच्या आदर्शांपासून ते काश्मिरी पंडितांच्या वेदनांपर्यंत सर्व काही चित्रपटावर सोडायचे आहे का? वस्तुस्थिती आणि सत्याला सामोरे जाऊन मोदी सरकारला आपली जबाबदारी शेवटी कधी कळणार? किती दिवस तुम्ही फक्त खोटेपणा, द्वेष पसरवण्यामध्ये राजकीय संधी शोधत राहणार?,” असे ही त्यांनी यावेळी ठणकावून विचारले आहे.

पुढे इतिहासाची आठवण करुण देत, “जेव्हा भाजपा समर्थित सरकारमध्ये काश्मिरी पंडितांवर अत्याचार आणि स्थलांतर होत होते तेव्हा राजीव गांधींनी संसदेचा घेराव केला, आवाज उठवला. मात्र भाजपाने राजकीय फायद्यासाठी ‘रथयात्रा’ काढून या शोकांतिकेला छुपा पाठिंबा दिला. ते तेव्हाही तसेच होते आणि आजही तसेच आहेत,” अशा शब्दात भाजपला सुरजेवाल यांनी सुनावले आहे.

इतकेच नव्हे तर, “१९२५ ते १९४७ या काळात तुमची संघटना देशाच्या स्वातंत्र्य चळवळी आणि बापूंच्या विरोधात उभी राहिली. ‘असहकार आंदोलन’ असो, ‘सविनय कायदेभंग’ असो किंवा ‘छोडो भारत’चे देशव्यापी आंदोलन असो… प्रत्येक वेळी इंग्रजांच्या पाठीशी उभे राहिलात. देश स्वतंत्र झाल्यावर पहिल्या दिवसापासून ‘फोडा आणि राज्य करा’चा अवलंब केला,” अशी टीका आपल्या ट्विटमधून सुरजेवाल यांनी भाजपवर केली आहे.

दरम्यान द काश्मिर फाईल्स चित्रपटाचे कौतुक करताना, “काश्मिर फाईल्स खूप चांगला चित्रपट आहे. तसेच हा चित्रपट तुम्ही सर्वांनी बघायला हवा. एक गट अजूनही सत्य दडपवण्याचा प्रयत्न करत आहे. काही लोकांनी यापूर्वीही असेच केले होते. परंतु आपल्याला सत्य देशासमोर आणण्याची गरज आहे.” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या
गुजरात फाईल्सवर मी चित्रपट बनवायला तयार आहे पण.., दिग्दर्शकाचा थेट मोदींना सवाल
‘द काश्मीर फाईल्स’ चा बॉक्सऑफिसवर धुमाकूळ; आत्तापर्यंत केली ‘एवढ्या’ कोटींची कमाई
रोहित, विराटपेक्षाही श्रीमंत आहे ‘हा’ खेळाडू; एका आठवड्यात कमावतो तब्बल १६ कोटी
द काश्मीर फाईल्स पाहिल्यानंतर लोकांवर होत आहे ‘हा’ परिणाम, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now